thursday the election of sarpanch in 236 village in kolhapur district
thursday the election of sarpanch in 236 village in kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापूर : २३६ गावांमधील सरपंच निवडी गुरुवारी, उत्सुकता शिगेला

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात सरपंच आरक्षणातील अनियमिततेमुळे स्थगित झालेल्या २३६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडी गुरुवारी (ता. २५) होणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नूतन सदस्यांची पहिली सभा गुरुवारी घेण्याचे आदेश दिले आहेत. यात गडहिंग्लजमधील ५०, पन्हाळा ४२, करवीर ५४, शाहूवाडी ४१, भुदरगड १६ व शिरोळमधील ३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

फणसवाडी (ता. भुदरगड)च्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. तेथील ९ फेब्रुवारीला होणारी सरपंच-उपसरपंच निवड १६ पर्यंत रोखून ठेवली होती. सुनावणीनंतर याचिकाकर्तांचा अर्ज मान्य केला आहे. त्यानुसार भुदरगड तालुक्‍यातील अनुसूचित जाती व अनुसूचित स्त्री, अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती स्त्री आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री हे आरक्षण कायम ठेवून सर्वसाधारण प्रवर्गातील सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गाचे फेरआरक्षण सोमवारी (ता. २२) काढण्याचे आदेशही भुदरगड तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे भुदरगड तालुक्‍यातील ४५ पैकी १६ ग्रामपंचायतींची सरपंच निवड गुरुवारी, तर उर्वरित २९ ग्रामपंचायतींची सरपंच निवड सोमवारी फेरआरक्षणानंतर होईल.  

तळेवाडी (ता. गडहिंग्लज) सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका होती. त्यामुळे या तालुक्‍यातील ९ फेब्रुवारीला घेतल्या जाणाऱ्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी १६ फेब्रुवारीपर्यंत रोखून ठेवण्याबाबत आदेश दिले होते. दरम्यान, याचिका दाखल केलेल्या ग्रामपंचायतींच्या सुनावणीनंतर १५ फेब्रुवारीला आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्‍यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी गुरुवारी होणार आहेत. याचप्रमाणे उंड्री (ता. पन्हाळा), कोगे व खुपिरे (ता. करवीर) आणि गिरगाव (ता. शाहूवाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय घेऊन गुरुवारी सरपंच-उपसरपंच निवड होणार आहे. शिरोळ तालुक्‍यातील शिरटी, मजरेवाडी, तमदलगे या ग्रामपंचायतींसह ३३ निवडीही गुरुवारी होणार आहेत. 

तालुकावार गावे

  • तालुका       ग्रा.पं.ची संख्या
  • गडहिंग्लज      ५०
  • पन्हाळा          ४२
  • करवीर          ५४
  • शाहूवाडी        ४१
  • भुदरगड         १६ 
  • शिरोळ          ३३

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT