tiger esakal
कोल्हापूर

अन् काळजाचा ठोका चुकला; डोळ्यासमोर 2 झेपतच वाघानं रस्ता पार केला

आज सकाळपासून या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

- राजू पाटील

राशिवडे बुद्रुक : परिते-कुरूकली (ता. करवीर) दरम्यान काल रात्री दहाच्या सुमारास वाघाने दर्शन दिल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. एका पिग्मी एजंटला कोल्हापुर-राधानगरी राज्य मार्ग पार करून गेलेला वाघ आढळला. तो पट्टेरी वाघ, बिबट्या की तरस या बाबत अद्याप संभ्रम असून वनखाते तपासणी करणार आहे.

याबाबत माहिती अशी, काल रात्री दहाच्या सुमारास भोगावती येथील गजानन महाराज पतसंस्थेचे पिग्मी एजंट शिवाजी टिपुगडे हे कुरुकली कडून पिग्मी घेऊन गावाकडे येत होते. याच वेळी परिते येथील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात असलेल्या दौलत हॉटेलकडे भोगावती नदीकडून अचानक वाघाने झेप घेतली. दोन झेपेतच राज्यमार्ग पार करून तो डोंगराकडे पळाला. यामुळे घाबरलेल्या टिपुगडे यांनी गावकऱ्यांना सांगितले. याबाबत रात्री ग्रामपंचायतीने सर्व गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला. आज सकाळपासून या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन्यजीव विभागाचे पथक आल्यानंतर याबाबत शहानिशा होईल.

"मी रात्री कुरुकली येथून पिग्मी गोळा करून गावाकडे येत होतो. अचानक समोर रस्त्यावरच वाघाने झेप घेऊन रस्ता पार केला. राधानगरीकडून एक चारचाकी गाडी त्याचवेळेला आल्याने बिथरलेल्या वाघाने पळ काढला. माझ्या पाहणीनुसार तो वाघच होता."

- शिवाजी टिपूगडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : प्रभाग 13 मध्ये आदर्श मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी मोबाईल घेऊन जाणाऱ्या वर केली कारवाई

Exit Poll: महापालिका मतदानाचा थरार! निकालाआधीच आज साम टीव्हीवर एक्झिट पोल; पाहा संध्याकाळी ५.३० वाजता

IPAC Raid Case Update : ममता बॅनर्जींना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका! 'ED' अधिकाऱ्यांविरोधातील ‘FIR’ला स्थगिती

Central Line Megablock: मध्य रेल्वेवर महिनाभर मेगाब्लॉक! लोकलसह एक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडणार, कधीपासून आणि का?

Muncipal Elections 2026 : "अत्यंत ढिसाळ कारभार" निवेदिता सराफांची निवडणूक आयोगावर; यादीत नाव नाही अन् तासभर फरफट

SCROLL FOR NEXT