Time To Restart The Curriculum In Schools Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

अभ्यासक्रमाचा पुन्हा श्रीगणेशा करण्याची वेळ 

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : गेल्या आठवड्यापासून नववी ते बारावीच्या नियमित वर्गांना सुरवात झाली आहे. कोरोनामुळे शासनाच्या धोरणानुसार गेले चार महिने "शाळा बंद... शिक्षण सुरू' होते. विद्यार्थ्याना यू ट्यूब, व्हिडिओ, व्हॉटस ऍपच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविला गेला. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाचे आकलन झालेले नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शिक्षकांना पुन्हा अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा करण्याची वेळ आली आहे. 

वार्षिक परीक्षा होण्याअगोदरच कोरोनाचा संर्सग वाढू नये यासाठी शैक्षणिक वर्ष नाईलाजाने गुंडाळावे लागले. लॉकडाउनचा कालावधी वाढत गेल्यामुळे परीक्षाही रद्द करण्यात आल्या. वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेऊन निकाल लावला. जूननंतरही कोरोनाची स्थिती बदलली नसल्याने शाळा सुरू झाल्या नाहीत. जुलैनंतर तर कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शाळा सुरू होण्याचा मुहूर्त लांबत गेला. त्यामुळे शासनाने "शाळा बंद...शिक्षण सुरू' ही ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना राबवली. 

मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे व्हॉटस ऍप गट करण्यात आले. त्या गटात अभ्यासक्रमातील धडे, गृहपाठ दिला. काही शिक्षकांनी, तर त्या धड्यांचे व्हिडिओ करून शिकविण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला कुतूहल म्हणून विद्यार्थ्यांचा याला प्रतिसाद मिळाला. पंरतु, शाळा सुरू होण्याचा कालावधी लांबू लागला तसा विद्यार्थ्यांचा यातील रस कमी झाला. केवळ औपचारिकता म्हणूनच याकडे पाहिले गेल्याने हे ऑनलाईन शिक्षण कधी ऑफलाईन झाले हे कोणालाच कळाले नाही. 

आता गेल्या आठवड्यापासून एक दिवसाआड 50 टक्के उपस्थितीत योग्य ती खबरदारी घेत शाळा, कनिष्ठ महविद्यालये सुरू झाली. शिक्षकांना नियमित वर्गावर गेल्यावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविलेल्या अभ्यामक्रमाचे आकलन झालेले नसल्याचे आढळत आहे. केवळ मोजक्‍या विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला आहे. गृहपाठ अपुरा असल्याने अनेकांनी शाळेला दांडी मारल्याने उपस्थिती जेमतेम आहे. विशेषत: दहावीचे विद्यार्थी आकलनात पिछाडीवर असल्याने पुन्हा अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा करावा लागतो आहे. 

पालकांची सुटका 
गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. परिणामी, विद्यार्थी शैक्षणिक वातावरणापासून आठ महिने दुरावले होते. शाळेसह खासगी क्‍लासेस देखील बंद होते. परिणामी, वारंवार सांगूनही पाल्यांची अभ्यासाची मानसिकता नसल्याने पालकही वैतागले होते. त्यामुळे घराघरांत या नव्या प्रश्नामुळे चिंतेचे चित्र होते. एक दिवस आड का असेना विद्यार्थी शाळेला जाऊ लागल्याने पालकांनी सुटकेचा निश्‍वास टाकला आहे. 

शाळा सुरू झाल्या आहेत. वर्गात शिकविताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पूर्ण केलेला अभ्यासक्रम समजलेला दिसत नाही. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा शिकवण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे. 
- जी. एस. शिंद, साधना हायस्कूल, गडहिंग्लज 

संपादन - सचिन चराटी

Kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi and Xi Jinping meeting : अखेर मोदी अन् जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला! , ट्रम्प ‘टॅरिफ’वरही होणार चर्चा?

E20 पेट्रोल चुकूनही वापरू नका! 'या' कार कंपनीने ग्राहकांना दिला सल्ला, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Cyber Fraud : व्हॉट्सॲपवरील मैत्री पडली महागात; नाशिकमधील विवाहितेला १६ लाखांचा गंडा

Manoj Jarange News: मनोज जरांगे जुन्नरमध्ये दाखल, आंदोलनावर ठाम, अटींचे पालन करण्याचे पोलिसांना हमीपत्र, म्हणाले...

Asia Cup 2025: संजू सॅमसनची सलग 50+ धावांची खेळी, वाढवली शुभमन गिलसह गौतम गंभीरची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT