कोल्हापूर

स पटा

CD

भुये, भुयेवाडीत
तरुणांची रात्री गस्त
शिये : भुये, भुयेवाडी येथे पडलेल्या दरोड्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक गल्लीत गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेरच्या राज्यातून चोरटे आले असून सावध राहावे, असे आवाहन पोलिसपाटील यांनी केले आहे. यात्रेनिमित्त गावात पिंगळा, ज्योतिषी सांगणारा, बहुरूपी, वासुदेव, भंगार गोळा करणारे, अनेक लोक येतात. त्या लोकांना ग्रामस्थांनी घरात किंवा घराच्या बाहेर उभे करून घेऊ नये, असे आवाहन केले आहे. घराच्या दरवाजाच्या कड्या सहजासहजी निघणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यानी गल्लीत गस्त घालावी. गस्त घालताना सोबत चार ते पाचजण असावेत. हातात काठी व उजेडासाठी बॅटरी असावी, अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिस पथके तैनात केल्याचे शिरोली एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.


01751
सडोली दुमाला ः येथील मैत्रेय शिक्षण संकुलच्या कार्यालयाचे उद्‌घाटन करताना सूरमंजिरी लाटकर शेजारी डॉ. अनिता सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी, डॉ.वनमोरे आदी.

सडोलीत मैत्रेय शिक्षण संकुल कार्यालय
कसबा बीड : सडोली दुमाला सारख्या दुर्गम भागात फ्युजन सिव्हिलायझेशन ॲड एज्युकेशन कौन्सिलच्या मैत्रेय शिक्षण संकुल शिक्षण संस्थेचे रोपटे चांगल्या पद्धतीने वाढेल व त्याच्या वटवृक्ष होईल, असा विश्वास माजी महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी व्यक्त केला. यावेळी बेंगलोरचे आयकर आयुक्त विकास सूर्यवंशी उपस्थित होते. सडोली दुमाला (ता. करवीर) येथील मैत्रेय शिक्षण संकुल कार्यालयाचे झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ध्यक्षा डॉ. अनिता विकास सूर्यवंशी म्हणाल्या, ‘‘शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते. ग्रामीण भागातील तळागाळातील मुले शिक्षण क्षेत्रात यावीत हाच या मागचा उद्देश आहे. माजी प्राचार्य डॉ. वनमोरे म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील तरुणांना शैक्षणिक सुविधा माफक फी मध्ये पुरवण्यासाठी मैत्री शिक्षण संकुल सुरू केले आहे.’’

ज्योतिर्लिंग पतसंस्थेला १ कोटींनर नफा
कुडित्रे ः वाकरे (ता. करवीर) येथील ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेला गत आर्थिक वर्षात १ कोटी ९० लाख ढोबळ नफा झाला. संस्थेने ३५ कोटी ७४ लाख ठेवीचा व ३० कोटी २१ लाख कर्ज टप्पा पूर्ण केला आहे. या वर्षी ४० कोटी ठेवीचे उद्दिष्ट आहे. नेट बँकिंग मोबाइल ॲप सुविधा पुरविणार असल्याचे अध्यक्ष कृष्णा माने यांनी सांगितले. श्री. माने म्हणाले, ‘‘कोविड काळात संस्थेच्या चार कोटीने ठेवी वाढल्या, पुढील आर्थिक वर्षात ४० कोटी ठेवीचे उद्दिष्ट आहे. संस्थेचे खेळते भांडवल ४५ कोटी १९ लाख असून गुंतवणूक ११ कोटी ५० लाख आहे. निधी ५ कोटी १८ लाख असल्याचे सांगितले.’’
यावेळी उपाध्यक्ष मधुकर तोडकर, संचालक शंकर पाटील, शिवाजी पाटील, हिंदूराव पाटील, शिवाजी सूर्यवंशी, अरुण आळवने, रघुनाथ कांबळे, दिलीप शिंदे, हिंदूराव द. पाटील, अमित पाटील, अनुसया करपे, नीता माने, सचिव पांडुरंग बिरंजे, श्रीपती पाटील, शाखाधिकारी रायबा पाटील, बळवंत पाटील, वसुली अधिकारी सुरेश तोडकर आदी उपस्थित होते.

13259
13260
अध्यक्षपदी राजेश कांबळे
वडणगे ः येथील सिद्धार्थ तरुण मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२२ साठी उत्सव समिती नेमण्यात आली. उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजेश रमेश कांबळे व उपाध्यक्षपदी सचिन रामचंद्र कांबळे यांची निवड झाली अन्य कार्यकारिणीत खजानीस म्हणून जीवन कुरणे , किर्तीरत्न कांबळे, सेक्रेटरी- अमित माने यांची निवड करण्यात आली. मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

02291
दोनवडे ः येथे विविध विकासकामांचे उद्‍घाटन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, बाळासाहेब खाडे ,अमर पाटील, अविनाश पाटील, सरपंच सारिका जाधव.

दोनवडेत विकास कामांचे उद्‍घाटन
कुडित्रे ः दोनवडे येथे जल जीवन मिशन योजना, ग्रामपंचायत इमारत बांधणे, शाळा दुरुस्ती, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती आणि आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रयत्नातून डीपीडीसी तून पाण्याची वीज योजना, अशा विविध कामांतून एक कोटी ९७ लाखांची विकासकामे केली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष, राहुल पाटील यांनी केले. जल जीवन मिशन योजना, ग्रामपंचायत इमारत आणि विविध विकासकामांच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सारिका जाधव होत्या. कुलदीप पाटील यांनी स्वागत केले. संभाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, राजेंद्र खानविलकर, अमर पाटील, उपसभापती अविनाश पाटील,वसंत पाटील, डॉ. संगीता गुरव, एस. एम. पाटील, आंनदा कदम, सरदार पाटील, यशवंत पाटील, प्रियंका शिंदे आदी उपस्थित होते.

न्यू विद्यालयाचे ‘एनएमएमएस’ परीक्षेत
सांगवडेवाडी : छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत न्यू माध्यमिक विद्यालय उचगावच्या पाच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली.
या विद्यार्थ्यांना प्रत्येकी वार्षिक ९६०० प्रमाणे चार वर्षांसाठी ३८४०० रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे. विद्यार्थी असे- सुजाता बबन पाटील, वैष्णवी शंकर जामदार, साक्षी हंबीरराव तापेकर, सिद्धार्थ युवराज पाटील, संकेत सुनील नार्वेकर. संस्थेचे अध्यक्ष के. जी. पाटील, मुख्याध्यापक यू. पी. संकपाळ, जे. एस. पाटील, जे. ए. पाटील, ए. ए. पाटील, ए. व्ही. आळवणे, एस. सी. घोसरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT