कोल्हापूर

चिल्रलर पार्टी

CD

17239

हमको बचानी है ये जिंदगानी
वाड्यावस्त्यावरील मुलांची जल प्रतिज्ञा, चिल्लर पार्टीचा दहावा वर्धापन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होताना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाण्याचे अजूनही दुर्भिक्ष्य आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांसह वयोवृद्धांनाही जंगलात, डोंगरदऱ्यात वणवण करावी लागते. दुसरीकडे शहरात वेगवेगळ्या प्रकारे पाण्याचा अपव्यय सुरू आहे. या दोन टोकांना एकत्र आणून पाणी बचतीची प्रतिज्ञा घेत ‘हमको बचानी है ये जिंदगानी’ असा संदेश चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीने आज दिला. निमित्त होतं दहाव्या वर्धापनदिनाचं.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी जिल्ह्यातील आठ वाड्यांमधील शाळांमधील दोनशे शालेय विद्यार्थ्यांनी शाहू स्मारक भवन येथे ‘गॉड मस्ट बी क्रेझी-२’ या बालचित्रपटाचा आनंद घेतला. गाव सोडून कधीही बाहेर न पडलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथमच शाहू महाराजांचा न्यू पॅलेस पाहिला.
राधानगरी, शाहूवाडी आणि भुदरगड तालुक्यातील वाड्यांतील सात शाळांमध्ये ग्रंथालय सुरू करण्यासाठी तीन हजार रुपयांची पुस्तके आणि गणवेश दिले. अध्यक्षस्थानी शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक दत्तात्रय नांगरे होते. मल्हार जाधव या मुलाने लिहिलेल्या आणि त्यानेच चित्रे काढलेल्या ‘मल्हारच्या गोष्टी’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.
तत्पूर्वी ‘‘सिनेमा हे मनोरंजनाचे माध्यम आहे, मात्र ते समाजबदलाचेही माध्यम आहे. जगभरात अनेक चित्रपट बनतात. मात्र, आपण वेचून चित्रपट पहा, ऐका. माणूस बनवणारे पौष्टिक चित्रपट पहा,’’ असे आवाहन युवा दिग्दर्शक उमेश बगाडे यांनी केले.
बबन बामणे, ओंकार कांबळे, धनश्याम शिंदे, अर्शद महालकरी, अभिजित कांबळे, अनिल काजवे, सुधाकर सावंत, महेश नेर्लीकर, मिलिंद कोपार्डेकर, अभय बकरे, मिलिंद नाईक, नसीम यादव, अनुजा बकरे, पद्मश्री दवे, शिवप्रभा लाड, गुलाबराव देशमुख, सलीम महालकरी, भाऊ पाटील यांनी नियोजन केले. शिक्षक दिलीप मालंडकर, राजाराम रायकर, रवींद्र बोडके, सुहास पाटील, आनंदा काशीद, मारुती राठवड, अमोल काळे, गोविंद पाटील, ‘अवनि’ चे शिक्षक शिंदे, सुधाकर जोशी झोपडपट्टीतील विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांना ‘सिनेमा पोरांचा’ या चिल्लर पार्टीचे पुस्तक भेट दिले.

चौकट
मिशन पाणी...
आयुष्यात कधीही पाणी वाया घालवणार नाही. पाणी म्हणजे जीवन आहे, आयुष्य आहे. पाण्याशिवाय माणूस, प्राणी, पक्षी कोणताही जीव जगू शकत नाही याची जाणीव झालेली आहे. म्हणून मी कधीही पाणी वाया घालवणार नाही, पाण्याची बचत करेन अशी प्रतिज्ञा उपस्थित साऱ्या मुलांनी केली. या वेळी संगीतकार ए. आर. रेहमान यांचे ‘मिशन पाणी’ हे गीत दाखवले.

चौकट
दोन किलोमीटरची पायपीट
शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी भैरीचा धनगरवाडा येथील शालेय विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यासाठी गेलेल्या मिलिंद यादव यांना तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्‍य जाणवले. जंगलात असलेल्या या वाडीत विखुरलेल्या १७ घरांना पिण्यासाठी व खर्चाच्या पाण्यासाठी जंगलात दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. पाण्याचा जपून वापर करत थेंब अन् थेंब वाचवणाऱ्या तेथील मुलांच्या हस्ते वर्धापनदिनाचा केक कापला. भरपूर पाणी असणाऱ्या शहरातील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना त्या मुलांच्या बचतीचे महत्त्‍व मिलिंद यादव यांनी जाणवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT