कोल्हापूर

नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी शासकिय यंत्रणा सज्ज ठेवा : उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक

CD

01830

आपत्ती काळात यंत्रणा सज्ज ठेवा
हरिष धार्मिक; गगनबावड्यात आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा

गगनबावडा, ता. ११ : ‘‘संभाव्‍य आपत्ती काळात प्रत्‍येकाने कर्तव्‍य समजून सहकार्य करत मदतीसाठी सदैव तत्पर राहावे. नैसर्गिक आपत्तींना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवा. जनतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी,’’ असे आवाहन करवीर उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक यांनी केले. गगनबावडा तहसील कार्यालयात आयोजित नैसर्गिक आपत्‍ती व्यवस्थापन संबंधित आढावा बैठकीत ते बोलत होते.
उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक यांनी तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पांची माहिती घेतली. धरण जलाशय परिचलन सूचीनुसार पूरनियंत्रणाच्या दृष्टीने जलाशय पाणी पातळीचे नियोजन केले असल्याचे कळे पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अजिंक्य पाटील यांनी सांगीतले. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने जनतेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. राष्ट्रीय महामार्गावर अतिवृष्टीच्या काळात बहुतांशी रस्ते पाण्याखाली जातात. ज्याठिकाणी पुराचे पाणी येईल त्याठिकाणी बॅरिकेट्स लावावीत. पूरपस्थितीत जागोजागी प्रवासी अडकल्यास त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी. औषधांचा पुरेसा साठा करून अंगणवाडी कर्मचारी, आशासेविका यांच्या योगदानातून तो वितरित करत आरोग्‍य विभागाने सतर्क राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या. विजेची लाईन जंगलभागातून असून विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने महावितरणने सतर्कतेने काम करावे. पुरेशा रेशनचा साठा वितरित करावा; अशा सूचना धार्मिक यांनी देत सर्वच विभागांच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
तहसीलदार बी. जे. गोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अधिकाऱ्यांनी कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडत जनतेची सोय करावी. लोकांची विश्वासार्हता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी अलमास सय्यद, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, उपभियंता बी. एस. मिसाळ, उपकार्यकारी अभियंता व्ही. एम. जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल चोकाककर यांच्‍यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

SCROLL FOR NEXT