कोल्हापूर

हादग्याच्या गीतांनी ‘सह्याद्री’ परीसर चिंब

CD

03580
हेरे ः सह्याद्री विद्यालयातील विद्यार्थीनींनी हादग्यानिमित्त फेर धरुण गाणी गाईली.
----------------------
हादग्याच्या गीतांनी ‘सह्याद्री’ परीसर चिंब
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १५ ः ऐलमा, पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा अशा सुरेल गीतांनी हेरे (ता. चंदगड) येथील सह्याद्री विद्यालयाचा परीसर चिंब झाला. हस्त नक्षत्रातील हादग्याचा उत्सव साजरा करताना विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव होता. पटांगणात हत्तीच्या चित्राभोवती फेर धरुन विविध गीते गाताना हा आनंद द्विगुणीत झाला.
व्ही. एस. पाटील यांनी या उत्सवाचे महत्व सांगितले. शरद ऋतुत हस्त नक्षत्रात पाऊस ओसरत जातो. चार महिने कोसळणाऱ्या पावसाने धरणी चिंब झालेली असते. सर्वत्र हिरवाईचा शालू नेसून निसर्ग बहरलेला असतो. वातावरण अल्हाददायक असते. अशा वेळी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा उत्सव साजरा होतो. माणुस आणि निसर्ग यांचे अतुट नाते असून ते जपायला हवे. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थीनींनी गाणी गात खेळ मांडला. त्यानंतर घरातून आणलेले विविध खाद्यपदार्थ (खिरापत) वाटप केले. मुख्याध्यापक यु. एल. पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यापिका एस. आय. मुजावर, पी. पी. तिबिले उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: डुकराच्या मटणावरुन विधानसभेत संताप; सुरेश धसांच्या 'त्या' विधानामुळे रोहित पवार चिडले

Ravindra Jadeja: माझा पती तसा नाही, इतर भारतीय खेळाडू परदेशात जातात अन्... जडेजाच्या पत्नीचं खळबळजनक विधान; Video

Latest Marathi News Live Update : नागपूर विधानभवनावर ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा गाजर मोर्चा

Whatsapp मध्ये आलं नवीन फीचर! जाहिरातीतून कमवू शकता लाखो रुपये

सुष्मिता सेन लवकरच लग्न करणार? अभिनेत्रीच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चेला उधाण!

SCROLL FOR NEXT