कोल्हापूर

कुरणेवाडी खामकरवाडी दरम्यानच्या पुलाची दुरावस्था

CD

खामकरवाडीतील पुलाची दुरवस्था
धामोड : धामोड - म्हासुर्ली (ता. राधानगरी) मार्गावरील कुरणेवाडी - खामकरवाडीत लोंढा ओढ्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे खांब जीर्ण झाले असून हा पूल अखेरच्या घटका मोजत आहे. येथे नव्याने पूल बांधावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. लोंढा ओढ्यावर तीस वर्षांपूर्वी पूल बांधला. सध्या पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचा एक खांब जीर्ण झाला असून पडण्याच्या मार्गावर आहे. पाणी अडवण्यासाठीही पूल कमकुवत आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी येते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन दूध व्यवसायावर परिणाम होतो. अवजड वाहनांना हा पूल धोकादायक बनला आहे. अनेकदा येथे पूल बांधण्यासाठीचे निवेदन ग्रामस्थांनी शासनाला दिले आहे. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. जीविताचा धोका टाळण्यासाठी शासनाने नवीन पूल बांधावा; अशी मागणी कुरणेवाडीतील दगडू चौगुले यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT