Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : उचगावात पत्नीचा विनयभंग; दोन गटांत तुफान हाणामारी, 10 जण जखमी

शांतिनगरमध्ये दोन गटांत गुरुवारी जोरदार हाणामारी झाली.

सकाळ डिजिटल टीम

गांधीनगर : पूर्ववैमनस्यातून उचगाव पूर्व (ता. करवीर) येथील शांतिनगरमध्ये दोन गटांत गुरुवारी जोरदार हाणामारी झाली. त्यात दहा जण जखमी झाले. याबाबत गांधीनगर पोलिस (Gandhinagar Police) ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल आहेत. या प्रकरणातील आठ संशयितांना आज न्यायालयाने ता. १९ पर्यंत पोलिस कोठडी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शांतिनगर परिसरामध्ये रवींद्र मल्लू चव्हाण आणि सुरेश नुराप्पा चव्हाण या दोन कुटुंबांत वादाला सुरुवात झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात दहा जण जखमी झाले. सुरेश नुराप्पा चव्हाण (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रवींद्र मल्लू चव्हाण, चंद्रकांत मल्लू चव्हाण, अजय चंद्रकांत चव्हाण, (सर्व रा. उचगाव पूर्व शांतिनगर) यांच्यावर गुन्हा नोंद आहे.

रवींद्र मल्लू चव्हाण यांनी फिर्यादीनुसार माणिक श्रीपती चव्हाण, संतोष प्रल्हाद चव्हाण, प्रल्हाद बाबू चव्हाण, सुरेश नुराप्पा चव्हाण, विजय उत्तम पवार, गणेश आप्पा चव्हाण, गोविंद राजू चव्हाण, प्रताप मारुती चव्हाण (सर्व रा. शांतिनगर, उचगाव पूर्व) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, याप्रकरणी एका गटाने विनयभंग झाल्याची तक्रार नोंद करावी, अशी मागणी करत शुक्रवारी दिवसभर पोलिस ठाण्याच्या आवारात तळ ठोकला होता. संध्याकाळी अनेक महिलाही पोलिस ठाण्यासमोर दाखल झाल्या. रात्री नऊ वाजले तरी पोलिसांचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने संयम सुटलेल्या जमावाने पोलिस ठाण्याच्या आवारात घुसला.

जमावाने जोरदार घोषणाबाजी करत तेथेच ठिय्या मारला. संतप्त महिलांनी पोलिसांचा तीव्र शब्दात निषेध केला. सहायक निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी रात्री दहा वाजता तक्रारीनुसार फिर्याद घेत असल्याचे सांगितले; पण जमावाने तत्काळ अटक केल्याशिवाय आम्ही हलणार नसल्याचे सांगितले. अखेर रात्री बाराच्या सुमारास पुरवणी जबाब घेऊन कलम वाढवण्यात आल्याने जमाव माघारी परतला. दरम्यान, गांधीनगरचे पोलिस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT