कोल्हापूर

आयटीआय़ प्रवेश सुरु

CD

गडहिंग्लज शासकीय
आयटीआय़ प्रवेश सुरू
दहा कोर्सेस; २९६ प्रवेशक्षमता

गडहिंग्लज, ता. १४ : य़ेथील शेंद्री माळावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची (आय़टीआय) प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने ११ जुलै अखेर अर्ज करण्याची मुदत आहे. याठिकाणी चार एका वर्षाचे तर सहा दोन वर्षाचे अशा एकूण दहा कोर्सेसमध्ये २९६ विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता आहे. मुलींच्यासाठी खास ड्रेस मेकिंग कोर्स आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी आय़टीआयची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत. खुल्यासाठी १५० तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये प्रवेश अर्जाची किंमत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी रोज सकाळी १० ते ११ वेळेत मोफत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य स्वानंद देवधर यांनी दिली.
य़ेथील शासकीय आय़टीआय़ कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी संस्था आहे. वीस एकर परिसरात संस्थेचा परिसर आहे. पन्नास मुलांसाठी स्वतंत्र्य वस्तीगृह आहे. दरवर्षी बहुतांशी विद्यार्थी कँम्पस इंटरिव्ह्यूमधून विविध नामांकित उद्योगसमूहात निवडले जातात. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ९० तर परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १० जागा आरक्षित असतात. मुलींसाठी ड्रेस मेकिंग कोर्स आहे. मुलींसाठी प्रत्येक कोर्सला ३० टक्के जागा राखीव आहेत.

चौकट..
अभ्यासक्रम, कंसात कालावधी
*वेल्डर, मेकॅनिकल डिझेल, पंप ऑपरेटर, ड्रेस मेकिंग (एक वर्ष)
*इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिष्ट, टर्नर, मोटार मॅकेनिक, रेफ्रिजरेशन अँन्ड एअर कडिंशनिंग (दोन वर्ष)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Election : भाजपविरोधी मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी महाविकास आघाडीची मोठी खेळी

New Year Koyna tourism: वासोटासह 'कोयनेतील पर्यटन' ३१ डिसेंबरला बंद! या कारणामुळे वन विभागाने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सटाणाच्या तळवाडे दिगर येथे ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन, शेतकरी आक्रमक

Paradh News : दोन बांगलादेशीची स्वदेशात रवानगी; पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा नोंद

वैताग आलाय, लोक विचारतायत, बायको विचारतेय...; भाजपच्या निष्ठावंताला अश्रू अनावर, उमेदवारी नाकारल्यास आत्मदहनाचा इशारा

SCROLL FOR NEXT