कोल्हापूर

गारगोटी : डॉ. आंबेडकर व्याख्यानमाला

CD

02789
राज्यघटना बुद्ध
विचारांशी सुसंगत

बी. एम. कौसल ; शाहू वाचनालयातर्फे डॉ. आंबेडकर व्याख्यानमाला

गारगोटी, ता. ५ : भारतीय राज्यघटनेची निर्मिती फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणे नसून अडीच हजार वर्षांपूर्वीच्या गौतम बुद्धांच्या विचारांशी सुसंगत आहे. व्यक्तीचा विकास राजेशाहीत होत नाही तर लोकशाहीत होतो. सार्वजनिक शिक्षण लोकशाहीचा पाया असतो हे बुद्धांनी ओळखले होते, असे प्रतिपादन माहिती विभागाचे निवृत्त संचालक व अभ्यासक बी. एम. कौसल यांनी केले.
शाहू वाचनालयात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार बजरंग देसाई होते. ‘लोकशाही आणि बुद्धधर्म’ हा विषय होता. श्री. कौसल म्हणाले, ‘जीवनात ज्ञान महत्त्वाचे असून माणसाने विविध ज्ञानशाखा अभ्यासल्या पाहिजे. तरच कल्याण होते असा गौतम बुद्धांच्या शिकवणीतील अर्थ आजच्या लोकशाही काळात घेऊ शकतो. बुद्धाच्या अहिंसेने भारताचा पराभव झाला असा आक्षेप चुकीचा आहे. देश संरक्षणासाठी युद्ध करा, असे त्यांनी सांगितले आहे. स्वातंत्र्य, बंधुता ही राज्यघटनेतील तत्त्वे वेदपूर्व काळातील होती. योग्य मार्गाने संपत्ती मिळवा, तिचे संरक्षण करा, योग्य नियमन करा असा सिद्धांत बुद्धांनी मांडला. त्यासाठी सहा मार्ग सांगितले होते. ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ग्रंथपाल प्रवीण गुरव यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: "आताही बॅगा घेऊन आलोय...", चक्क मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी, संजय राऊतांच्या आरोपाला दिले उत्तर

प्राणघातक होर्डिंग नीट दिसण्यासाठी 8 झाडांना दिलं होतं विष, FIR ही देखील नोंदवला गेला, पण... BMC चा धक्कादायक खुलासा!

Latest Marathi News Live Update : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोरूनच पोलिसांच्या ३ दुचाकी चोरीला

Nashik News : बोटावरची शाई दाखवा अन् मोफत दाढी, किंवा हेड मसाज करा! सलून चालकानं लाढवली अनोखी शक्कल

Manoj Jarange : मनोज जरांगे यांची 900 एकरांवरील सभा रद्द; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT