कोल्हापूर

डॉ. आंबेडकर पुतळाप्रश्नी तोडगा काढा

CD

05041
जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी, सावकर मादनाईक आदी उपस्थित होते.
-----------
डॉ. आंबेडकर पुतळाप्रश्नी तोडगा काढा
माजी खासदार राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी; आंदोलनस्थळास भेट
जयसिंगपूर, ता. १२: शहरातील क्रांती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेप्रश्नी निर्माण झालेला वाद दुर्दैवी आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून व्यापक बैठक बोलावून सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी (ता.१२) आंदोलनस्थळी दिली.
पुतळ्याच्या जागेवरून सध्या वाद सुरू आहे. तो मिटवून हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. मुंबईत याप्रश्नी बैठक घेण्याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे. क्रांती चौकात कोर्टाची जुनी इमारत आहे. मात्र येथील बसस्थानकाच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. देशाला घटना देणाऱ्‍या महामानवाचा पुतळा मुख्य चौकात होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
क्रांती चौकात असलेल्या जुन्या कोर्टाच्या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा या मागणीसाठी आंबेडकरवादी पक्ष व संघटना यांच्याकडून आज तिसऱ्‍या दिवशी साखळी उपोषण सुरु आहे. माजी आमदार उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष शैलेश आडके, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने, सुजाता शिंदे, माजी नगरसेवक शैलेश चौगुले, बजरंग खामकर, सागर मादनाईक यांनी उपोषणाला पाठिंबा देऊन पुतळा क्रांती चौकातील जुन्या कोर्टाच्या जागेतच झाला पाहिजे, अशी मागणी करीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा त्यांनी दिला.
माजी नगराध्यक्षा डॉ. निता माने, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, संदिप पुजारी, रमेश शिंदे, कैलाश काळे, श्रीपती सावंत, आदम मुजावर, रावसाहेब निर्मळे, सुनिल कांबळे आदी आंदोलनात सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement: दिग्गज अष्टपैलूची ३५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा, दोन वर्षांपूर्वी खेळलाय शेवटचा कसोटी सामना

पुण्यात भाजपने दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलं तिकीट, निष्ठावंत नाराज; बंडखोरीची शक्यता

एवढी गर्दी की, 'थलपती' विजय कोसळला, जीवघेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावला, viral video

CRPF Recruitment 2025: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! 25,487 जागांसाठी भरती सुरू, 31 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

New Year 2026 : आपण कुठे चाललो आहोत?

SCROLL FOR NEXT