कोल्हापूर

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आरपारची लढाई

CD

05047
जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनास मुरलीधर जाधव यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी गुलाबराव घोरपडे, सौरभ शेट्टी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
-------------
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आरपारची लढाई
मुरलीधर जाधव; जयसिंगपूर येथील साखळी उपोषणास पाठिंबा
जयसिंगपूर, ता.१३ : देशाला घटना देणाऱ्‍या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा सन्मानपूर्वक जुन्या न्यायालयाच्या जागेत बसवा अशी मागणी शिरोळ तालुक्यातील सर्व पक्ष, लोकप्रतिनिधी, आघाड्यांसह संघटनांची आहे. त्यामुळे न्यायालयाच्या जागेतच पुतळा झाला पाहिजे यासाठी आता आर या पारची लढाई लढू, असा इशारा, उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधाव यांनी सोमवारी दिला.
जयसिंगपूर येथील जुन्या न्यायालयाच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा या मागणीसाठी आंबेडकरवादी पक्ष व संघटना यांच्याकडून सोमवारी चौथ्या दिवशी साखळी उपोषण सुरु आहे. यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, माजी नगरसेवक पराग पाटील, माजी सभापती स्वाती सासणे, आण्णासाहेब बिलोरे, तेजस कुराडे-देशमुख, शिवाजी जाधव, सौरभ शेट्टी, गुलाबराव घोरपडे, जयदिप थोरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाप्रमुख विलास कांबळे, आपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन कदम, जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे आदिंनी आंदोलनास पाठिंबा देऊन पुतळा जुन्या न्यायालयाच्या जागेतच झाला पाहिजे अशी मागणी केली.
चंद्रकांत जाधव-घुणकीकर, बजरंग खामकर, रमेश शिंदे, कैलाश काळे, श्रीपती सावंत, आदम मुजावर, रावसाहेब निर्मळे, सुनिल कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT