कोल्हापूर

अकरा वर्षे वाकरे ग्रामस्थांचा उपक्रम

CD

03493, 03494

सुटीत मुलांवर संस्कृतीचे संस्कार
अकरा वर्षांपासून वाकरेत ग्रामस्थांतर्फे उपक्रम; शिबिरात यंदा २०० मुलांचा सहभाग

कुडित्रे, ता. ८ ः विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आणि सुट्टी सुरू झाली आहे. सुटीत मामाच्या गावाला जाण्याची परंपरा खंडित झाली आहे. सुटीत मामाच्या गावाला जाण्याची जागा मोबाईल आणि टीव्हीने घेतली आहे. याला फाटा देत वाकरे ग्रामस्थांच्यावतीने सुट्टीत मुलांवर संस्कृतीचे संस्कार केले जात आहेत. प्राणायाम, योगासने, वैदिक, सांप्रदायिक प्रार्थना, सुभाषिते, हरिपाठ, हनुमान चालीसा, भगवद्गीता याचे धडे दिले जात आहेत.
अकरा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
वाकरे (ता. करवीर) येथे विद्यामंदिर पटांगणात श्री ज्ञानेश अध्यात्म विद्या संस्था, माऊली जन्मक्षेत्र आपेगाव संचालित ग्रामपंचायत वाकरे ग्रामस्थांतर्फे विद्यार्थ्यांसाठी सुटीत बालसुसंस्कार शिबिर २ ते २१ मे या कालावधीत होत आहे. शिबिराचे भानुदास महाराज अध्यापक आहेत. २० दिवसांच्या निवासी शिबिराचे उद्घाटन ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते झाले. शिबिरात करवीर, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांसह इस्लामपूर, हातकणंगले, कोल्हापूर शहर, निपाणी परिसरातील दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी मार्गदर्शन करतील. शिबिरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्राणायाम, योगासने, वैदिक, सांप्रदायिक प्रार्थना, सुभाषिते, हरिपाठ, हनुमान चालीसा, भगवद्गीता, पखवाज, तबला, हार्मोनियम, रामायण, पालक आणि संस्कार, शारीरिक स्वास्थ अशा सामाजिक, धार्मिक विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. युवापिढी सुसंस्कारित घडविण्यासाठी हा उपक्रम आहे. सरपंच अश्विनी पाटील, पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचेही सहकार्य मिळाले आहे.

कोट
मुलांचे वैचारिक प्रबोधन व्हावे, विज्ञान आपल्यासाठी आहे. साधनांच्या आहारी जाता कामा नये. मुलांवर शिक्षणाबरोबर चांगले संस्कार होण्यासाठी शिबिराचे आयोजन केले.
- भानुदास महाराज,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT