कोल्हापूर

कागल : प्रतिकूल परिस्थितीत यश

CD

05134
प्रियांका चौगुले
वडिलांच्या निधनाचे दुःख
उरात ठेवून दुसरा क्रमांक
कागल ता. २५ : वडिलांचे दुःख उरात ठेवून एका विद्यार्थिनीने कला शाखेत ७७.३० गुण मिळवून मिळविले. विशेष म्हणजे शाळेत देखील ती द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रतिकूल परिस्थितीत यश मिळविलेल्या एकोंडी (ता. कागल) येथील या विद्यार्थीनीचे नाव आहे प्रियांका बाळू चौगुले. ती येथील श्री शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थीनी आहे.
वडिलांचे तिच्यावर व तिचे वडिलांच्यावर जिवापाड प्रेम होते. वडील तिला शाळेच्या गेटवर दररोज सोडून कामावर जायच. हा नित्य नियम होता. असेच एक दिवस नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिला शाळेत सोडून वडील कामावर गेले. पण कंपनीच्या गेटच्या जवळच त्यांना अपघात झाला आणि या अपघातातून ते वाचले नाहीत. तिचे वडिलांचे छत्र हरपले. पायाखालची वाळू सरकली. हे दुःख पचविणे तितकं सोपं नव्हतं. त्यातून बारावी या महत्त्वाच्या वर्षी तीन महिने शाळा शाळेपासून वंचित राहावे लागले. वर्गशिक्षिका व्ही. एन. शिंदे - मडिवाळ यांनी दिलेल्या प्रोत्साहनाने तिने परीक्षा दिली आणि या परीक्षेत येथील श्री शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये कला शाखेत तब्बल ७७.३० टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय क्रमांकही पटकावला.
प्रियांकाच्या घरी आई व चौथीत शिकणारे दोन लहान भाऊ आहेत. प्रियांकाला मोठं होऊन वकील व्हायचे आहे किंवा स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे आहे. समय सूचकता व आत्मविश्वास तिच्यात ठासून भरला आहे. त्यामुळे हे यशही ती सहज खेचून आणेल असा विश्‍वास शिक्षकांना आहे.
---------
चौकट
05133
प्रीती संकपाळ
प्रीतीचे यश कौतुकास्पद
कागल : शाहू हायस्कूलची प्रीती राजेंद्र संकपाळ या विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत मिळवलेले यशही कौतुकास्पद आहे. मूळच्या कर्नाटकातील असलेल्या व आई एका हॉटेलमध्ये चपाती लाटण्याचे काम करत असलेल्या या विद्यार्थ्यांनीने कला शाखेत ७३.५० टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांक पटकावित शिकण्याची जिद्द दाखवून दिली. शाळाच बंद करायची असा विचार असलेल्या या मुलीसदेखील याच शिक्षिकेने प्रोत्साहित केले व तिचे अकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. येथील हणबर गल्लीत भाड्याच्या घरात राहत आहेत. घरचे कामकाज सांभाळत या मुलीने मिळविले यश कौतुकास्पद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT