कोल्हापूर

कागल : करनूर मध्ये खुनी हल्ला

CD

करनूरमध्ये वृद्धावर
कोयत्याने हल्ला
सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ८ : करनूर शेखमळा (ता. कागल) येथील गुलाब बाबालाल शेख (वय ६०) यांच्यावर अनोळखी तीन ते चार व्यक्तींनी आज रात्री कोयत्याने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी केले. डाव्या कानाजवळ वर्मी घाव आहे. कोयता डोक्यातच अडकल्याने शेख यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान करनूर ते शेख मळा या दरम्यानच्या रस्त्यावर ही घटना घडली. यामुळे करनूरसह परिसरातील गावांमध्ये एकच खळबळ उडाली.
याबाबत सीपीआर व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी ः करनूर येथे शेख यांची जमीन आहे. ते शेती करतात. ते सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास गावातीलच स्मशानभूमीजवळ जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडले होते. याच रस्त्यावरून येणाऱ्या - जाणाऱ्यांनी ही माहिती शेख कुटुंबीयांना दिली. काही वेळात कुटुंबीय घटनास्थळी आले. यावेळी शेख यांच्या डोक्यात कोयता अडकलेला दिसला. शेख यांच्या मुलांसह भाच्यांनी त्यांना कागल रुग्णालयात नेले. मात्र, या ठिकाणी त्यांच्यावर उपचार होणार नाहीत, त्यांना सीपीआरला नेण्याची सूचना दिली. त्यानुसार रात्री त्यांना सीपीआरमध्ये आणण्यात आले. शेख यांच्या हातावरही वार आहेत. दरम्यान, शेख यांचे गावात किंवा त्यांच्या मळ्यात कोणाशीही वैर नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणी आणि कशासाठी हल्ला केला, हाच प्रश्‍न कुटुंबीयांसह त्यांच्या नातेवाईकांना पडला आहे. कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार तपास करीत आहेत.
पोलिसांनी घटनास्थळाजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत हल्ल्याचे कारण व हल्ला कोणी केला, हे स्पष्ट झालेले नव्हते. घटनास्थळास कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट देऊन घडलेल्या प्रकारणाची माहिती घेतली.

डोक्यात अडकेला कोयता
सीपीआरमध्ये काढला
अनोळखी हल्लेखोरांनी कोयत्याचे सपासप वार केले आहेत. शेवटचा वार शेख यांच्या डोक्यात रुतून बसला होता. त्याच अवस्थेत नातेवाईकांनी शेख यांना सीपीआरमध्ये आणले. तेथील डॉक्टरांनी शेख यांच्या डोक्यात अडकलेल्या कोयता काढला; मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : हवामान विभाकडून पावसाचा ग्रीन अलर्ट, पण...; आणखी किती दिवस राहणार रिपरिप?

पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर रात्री दीडलाच का केला हल्ला? CDS चौहानांचा 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठा खुलासा; म्हणाले, 'पहिली अजान...'

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

Latest Marathi News Updates : मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; पोलिसांचा कडक तपास सुरु

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

SCROLL FOR NEXT