कोल्हापूर

समस्यांच्या गर्तेत बोंद्रे नगर

CD

04531, 04530
बोंद्रेनगर : मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे. दुसऱ्या छायाचित्रात शिवकृपा कॉलनीत तुंबलेल्या गटारी.

लोगो
समस्यांच्या गर्तेत
बोंद्रेनगर : भाग - १

लीड
बोंद्रेनगर व अंतर्गत कॉलनींमध्ये नागरी सुविधांची प्रतीक्षा आहे. येथे आरोग्याची हेळसांड सुरू असून खड्ड्यांमुळे रस्ते धोकादायक बनले आहेत. या समस्यांचा लेखाजोखा मांडणारी मालिका आजपासून...

शहरात असूनही प्राथमिक सुविधांची प्रतीक्षा
१३ वर्षांपासून रस्त्यावर डांबर नाही; कचरा उठाव, सांडपाण्याच्या समस्या कायमच
प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : फुलेवाडी रिगरोडवरील बोंद्रेनगर हे शहराच्या पश्चिम हद्दीत असूनही येथे नागरी सुविधांचा अभाव आहे. रस्ते, कचरा उठाव यासह अनेक समस्या स्थानिकांना भेडसावत आहेत. शहरात असून ही प्राथमिक सुविधांच्या प्रतीक्षेत येथील नागरिक दिवस काढत आहेत. खेड्यातसुद्धा यापेक्षा चांगले रस्ते व इतर सुविधा असतात, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करतात. गेल्या १३ वर्षांपासून परिसरातील रस्ते डांबराच्या प्रतीक्षेत आहेत. परिसरात प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने बोंद्रेनगर समस्यांच्या गर्तेत अडकला आहे.
फुलेवाडी रिंगरोडवर असणाऱ्या या उपनगरात अंतर्गत रस्ते, गटारी तर बहुतांश ठिकाणी कचरा उठाव, सांडपाण्याच्या समस्या आहेत. स्थानिकांचा दिवस मोलमजुरीत जातो. मात्र, या परिसरात प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने रात्र वैऱ्याची असल्यासारखी वाटते.
फुलेवाडी रिंग रोडवरील या मुख्य नगराच्या हद्दीमध्ये सुमारे सतरा छोट्या-मोठ्या कॉलन्या असून यातील प्रत्येक कॉलनी कचरा उठावाची उणीव, अस्वच्छता यासह नागरी सुविधांचा अभाव आहे.
रिंग रोडवरील या कॉलन्यांमध्ये राजे संभाजी नगर व हरिप्रिया नगरामध्ये पाण्याची समस्या जाणवत असून इतर सर्व ठिकाणी अमृत योजनेमुळे मुबलक पाणी मिळते. त्याच्या उलट इतर सर्व अंतर्गत रस्त्याच्या प्रतीक्षेत नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत.
--------------------
कोट
कॉलनी अंतर्गत रस्ते, गटारी नसल्याने सांडपाण्याचा त्रास होत आहे. दिवसभर दुर्गंधी येत असल्याने लहान मुले आजारी पडतात. महापालिकेचे दुर्लक्ष आहे.
- उदय कांबळे, शिवकृपा कॉलनी
-----------------
कोट
बोंद्रेनगर परिसरात जिल्ह्यातील विविध भागांतून रहिवाशी आले आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी परिसरात पोलिस चौकीची मागणी आहे. तसेच रस्ते, गटारी नसल्याने आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. महापालिकेचे दुर्लक्ष आहे.
- रिंकू देसाई, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT