diwali festival 2023 Sakal
कोल्हापूर

Diwali Festival : इको फ्रेंडली कंदील निर्मितीतून पंधरा महिलांना मिळाला रोजगार

पर्यावरणपूरक आकाश कंदील निर्मितीतून रोजगारपंधरा महिलांना अर्थार्जन; व्यवसायातून वर्षभर घरकाम करत कमाई

प्रकाश पाटील

कोल्हापूर : पर्यावरणपूरक आकाश कंदील बनविण्याच्या व्यवसायातून सध्या पंधरा महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पाचगाव रोडवरील अपूर्वानगर येथील वर्षा भूमकर यांनी यासाठी पुढाकार घेत महिलांना उद्योजक बनविले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील पंधरा महिलांना अर्थार्जन होत आहे.

महिलांनी केवळ एक हजाराच्या भांडवलातून हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना यातून वर्षभर काम मिळत आहे. घरकाम सांभाळून त्यांना दररोज किमान २५० ते ४०० रुपये मिळतात. भूमकर यांनी २०१२ मध्ये एक हजार रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू केला. आज त्यांना यासाठी दहा हजारांचा दोराच लागतो. व्यवसायाची व्याप्ती वाढल्याने सध्या त्यांच्याकडून परिसरातील १५ महिलांना रोजगार मिळाला आहे.

१२० प्रकारचे आकाश कंदील

पर्यावरणाला कोणताही धोका पोहोचू नये. यासाठी कागदी पुठ्ठा, दोरा, चोळीचे खण, कापडी पीस यातून पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार केले जातात. यामध्ये १२० प्रकार आहेत.

दोन वर्षांपासून मी हे काम करत आहे. आपल्या वेळेप्रमाणे काम होते. त्यातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग होतो.

- रुकसाना शेख, महिला कारागीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT