कोल्हापूर

कंदलगाव .निर्मिती कॉर्नर चौकातील कोंडीने वाहनधारक त्रस्त.. सायंकाळच्या वेळेत वाहतूक पोलिसाची गरज..

CD

07803

निर्मिती कॉर्नर चौकातील
कोंडीने वाहनधारक त्रस्त

सायंकाळच्या वेळेत वाहतूक पोलिसाची गरज

कंदलगाव, ता. १६ : आयटीआय व हॉकी स्टेडियमकडून उपनगरांत जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने येथील निर्मिती कॉर्नर चौकात वाहतूक कोंडी रोजचाच विषय बनल्याने या चौकात सायंकाळच्या वेळेत वाहतूक पोलिस नेमावा, अशी मागणी होत आहे.
शहराच्या दक्षिणेस उपनगराची वाढती संख्या लक्षात घेता या कॉर्नरवर सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक वाहनधारकांना तासभर कसरत करावी लागते. यामध्ये महिला प्रवासीही असतात. चौकात असणारे खड्डे व पाचगाव रस्ता अपुरा पडत असल्याने कोंडी नित्याचा विषय बनला आहे. सायंकाळी सहानंतर या रस्त्यावरून कळंबा, वाशीनाका, पाचगाव, रायगड कॉलनीसह गारगोटी, गिरगाव, नंदगावांतील वाहनांचे ताफे जात असतात.

चौकट.
स्थानिकांचे सहकार्य मोलाचे
शहरातून बाहेर पडल्यानंतर कळंबा, पाचगाव, आर. के. नगर या उपनगरांत जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्याने येथे सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीतून वाहतूक सुरळीत करण्यासाठी राहुल चौधरी व प्रथमेश लगारे यांच्यसह स्थानिकांनी सहकार्य केले.

कोट
उपनगरातील वाहनधारकांची संख्या लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेने या चौकात सिग्नल सुरू करावा ; अन्यथा वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी. कोंडीमुळे महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
- रुपेश पाटील, राज्य सहसंघटक संभाजी ब्रिगेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Kartik Purnima 2025: दिवे दान केल्याने माता लक्ष्मी अन् भगवान विष्णू कसे प्रसन्न होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT