कोल्हापूर

कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्ग विद्रूपीकरण

CD

85440
कचऱ्याच्या ढिगामुळे
राज्यमार्गाचे विद्रुपीकरण

कोल्हापूर-गारगोटी मार्ग; उठावाची मागणी

कळंबा, ता. २२ ः कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गाच्या दुतर्फा अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला आहे. वाऱ्याने कचरा सर्वत्र पसरत असल्याने नव्याने बांधण्यात आलेल्या राज्यमार्गाचे विद्रूपीकरण होत आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या वळीव पावसामुळे कचरा कुजला असून डास, माशा, दुर्गंधीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
महाराष्ट्र, कर्नाटकसह परराज्याला जोडणाऱ्या कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गाची नव्याने बांधणी सुरू आहे. रस्त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे. रस्त्याची रुंदी वाढली असून अनेक नाल्यांवर पूल बांधले आहेत. मात्र रस्त्याच्या दुतर्फा नागरिकाकडून घरातील दैनंदिन घनजैविकचरा, शीतपेये, मद्य व पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रुग्णांचे कपडे, जीर्ण अंथरूण असा कचरा टाकला जात आहे. हॉटेल व्यवसायामधील शिळे अन्न, नाशवंत खाद्यपदार्थ, चिकन मटण दुकानातील मांसयुक्त कचरा, पिसे उघड्यावरच व्यावसायिक टाकत आहेत. त्यामुळे भटकी जनावरे व कुत्र्यांच्या झुंडींचा वावर वाढला आहे. अनेक कुत्री फिरायला येणाऱ्या नागरिक, शेतकऱ्यांवर चाल करून जात आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कळंबा तलावाचे पाणलोट क्षेत्र आहे. कोल्हापूर इचलकरंजी प्रादेशिक उद्यानांतर्गत परिसरात तलावाला बाधा पोहोचवणारे उद्योग, हॉटेल व्यवसाय, नागरी वस्ती यांना मनाई आहे. मात्र येथील अनेक शेतीचे क्षेत्र पिवळ्या पट्ट्यामध्ये म्हणजेच नागरी विकासासाठी आरक्षित केले आहे. नागरी वस्ती व उद्योग व्यवसायाचे प्रमाण वाढत असून व्यावसायिक व नागरिक राज्य मार्गाच्या दुतर्फा व मोकळ्या जागेत कचरा आणून टाकलेला आहे.

कोट
कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गाशेजारी व कळंबा तलाव परिसरात कचरा आणून टाकणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर ग्रामपंचायतच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सुमन गुरव, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT