कोल्हापूर

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सुविधा देवू

CD

७६६१७
कोल्हापूर चित्रनगरीत
अद्ययावत सुविधा देऊ
मुनगंटीवार यांची बैठकीत घोषणा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरीतही अनेक मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. येत्या काळात कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले. श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात चित्रनगरी महामंडळ संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘‘कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहेत. या सोयीसुविधा निर्माण करताना त्या आधुनिक काळाशी सुसंगत असतील, तसेच या कामांची गुणवत्ता टिकून राहील, याकडे लक्ष देण्यात यावे. कोल्हापूर चित्रनगरीच्या अधिकाधिक विकास आणि आधुनिकीकरणावर भर देणे गरजेचे आहे. या संदर्भातील नियोजन करून प्रस्ताव तयार करण्याबरोबरच आवश्यक त्या निविदा काढण्याबाबत सूचना दिल्या आहेत.’’

रेल्वेस्थानकाचा सेट
कोल्हापूर चित्रनगरी येथे कायमस्वरूपी रेल्वे स्थानकाचा चित्रीकरण सेट तयार करण्यात येत आहे. या सेटच्या एका बाजूस शहरी आणि दुसरीकडे ग्रामीण बाजू तयार करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार आगळेवेगळे असावे, यासाठी स्पर्धा घेऊन संकल्पना चित्र अंतिम करावे, अशा सूचनाही यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी केल्या. सौरऊर्जा प्रकल्प बसविणे, बाह्य स्तोत्राद्वारे सुरक्षारक्षक पुरविणे, कर्मचारी पुरविणे, कोल्हापूर चित्रनगरीत आवश्यक तेथे पथदिवे लावणे, पाण्याची उच्चतम टाकी बांधणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विद्या वाघमारे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदीगरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, आर्किटेक्ट इंद्रजित नागेशकर आदी उपस्थित होते.

...तर इतर भाषिक चित्रपटांनाही सूट
महाराष्ट्रातील संतांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्यावर इतर भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती होते. अशा निर्मिती संस्थांनाही मराठी चित्रपटांप्रमाणे चित्रीकरणासाठी सूट देण्याबाबत विचार केला जाणार आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT