कोल्हापूर

काळभैरी यात्रेसाठी वाहतूक मार्गात बदल

CD

80091
------------------------------------------------
काळभैरी यात्रेसाठी
वाहतूक मार्गात बदल
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : ग्रामदैवत व महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री काळभैरव देवाची यात्रा ६ व ७ फेब्रुवारीला होत आहे. यात्रेसाठी येणाऱ्‍या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेने वाहतूक मार्गात बदल केला आहे.
श्री काळभैरव देवाचे मंदिर गडहिंग्लज शहरापासून पाच किमीवरील डोंगर कपारीत आहे. याच मार्गावरून कोल्हापूर आणि कर्नाटकातील वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. एका दिवसाच्या काळभैरी यात्रेसाठी कर्नाटक-महाराष्ट्र व कोकण भागातून तीन लाखांहून अधिक भाविक दुचाकी, चारचाकी वाहनाद्वारे हजेरी लावतात. डोंगरभाग, घाट व अरुंद रस्त्यामुळे वाहतूक खोळंबते. यापूर्वी वाहतुकीच्या गोंधळातून झालेल्या एका अपघातात पाच वर्षांपूर्वी महिला भाविकाचा मृत्यूही झाला आहे. वाहन पार्किंगसाठीही जागा अपुरी आहे. त्यातच रस्त्यावर वाहने लावूनच भाविक दर्शनासाठी जातात. परिणामी वाहतूक कोंडी अधिक होते. यामुळे अलीकडील काही वर्षांपासून एमआयडीसी परिसरातच वाहन पार्किंग केले जाते. तेथून वयोवृद्ध भाविकांना मंदिरापर्यंत ने-आण करण्यासाठी विशेष वाहनांची सोय केली जाते. यात्रेतील गर्दी लक्षात घेता पोलिस यंत्रणेने काळभैरी मार्गे कोल्हापूर व कर्नाटकात ये-जा जाणाऱ्‍या वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल केला आहे.
---------------
वाहतूक मार्गातील बदल असे
- कोल्हापूरकडून काळभैरी मार्गे गडहिंग्लजकडे येणारी वाहतूक : ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते ७ फेब्रुवारी रात्री १० पर्यंत बंद केला आहे. ही वाहतूक सनराईस हॉटेल-बहिरेवाडी मार्गे वडरगे रोडने गडहिंग्लजकडे वळवली आहे.
- गडहिंग्लजहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक लाखेनगर कमान, शेंद्री, हनिमनाळ, हिटणी (कर्नाटक) मार्गे तवंदी घाटातून कोल्हापूरकडे जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT