कोल्हापूर

पांढरे पट्टे गायब

CD

स्पीडब्रेकरवरील
पांढरे पट्टे रात्रीत गायब!
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः दसरा चौकातून खानविलकर पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या मार्गावर तीन स्पीडब्रेकर आहेत. मात्र, एकाही स्पीडब्रेकरवर ओळखून येण्यासाठी पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी दररोज एकतरी अपघात ठरलेला असतो. काल येथे पुन्हा एक अपघात झाला. यानंतर रात्री महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धावत येऊन येथे पांढरे पट्टे मारले; पण रात्री मारलेले पट्टे सकाळी पुन्हा गायब झाले. याबाबत स्थानिक नागरिकांकडून पुन्हा संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.
बहुतांश शासकीय कार्यालयांत जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. त्यामुळे हा रस्ता खूप रहदारीचा आहे. मात्र, स्पीडब्रेकर दिसून येत नसल्याने त्यांना गाडीवर ताबा मिळवणे अवघड जाते आणि अपघात होतात. याबाबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, ‘‘वारंवार अपघात होत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात ऑईलपेंटचे पट्टे येथे मारले आहेत; पण लवकरच थर्मोप्लास्टचे पट्टे मारले जाणार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगात असलेल्या आदेंकरांच्या घरातील दोघींना राष्ट्रवादीची उमेदवारी, अजितदादांनी दिले एबी फॉर्म

Sangli Election : काँग्रेससोबत बोलणी सुरूच; अन्यथा वंचित २१ जागांवर ‘गॅस सिलिंडर’वर रणांगणात

Latest Marathi News Live Update : वर्सोवा प्रभाग क्रमांक ५९ मध्ये ठाकरे गटात बंडखोरी उघड

Boxer Car Accident: दिग्गज बॉक्सरचा गंभीर अपघात, वेगात कार ट्रकवर आदळली; दोघांचा जागीच मृत्यू; Video

'मासिक पाळीच्या काळातही करायचा लैंगिक अत्याचार, घरात नग्न फिरायचा अन् महिलांकडं अश्लील...'; HR मॅनेजरची पतीविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT