कोल्हापूर

मालिका

CD

फोटो-11965
----
लोगो- भन्नाट माणसं...प्रेरक कहाणी ः भाग ३
-

प्राणी-पक्ष्यांत रमलेला आनंदयात्री
अगरबत्ती व्यावसायिक धनंजय नामजोशी सामाजिक कार्यातही सक्रीय

संदीप खांडेकर ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : एखाद्या प्राण्याचा अपघात असो अथवा घरात साप आलेला असो, कॉल आला की काम सोडून धनंजय वामन नामजोशी तेथे पोचतात. प्राण्यावर तत्परतेने उपचार सुरू करतात. दुखापत गंभीर असेल तर पांजरपोळमधील राजकुमार बागल किंवा रुईकर कॉलनीतील डॉ. अनिल पाटील यांच्याकडे त्याला घेऊन जातात. साप असेल तर त्याला कोणी मारू नये, यासाठी प्रबोधन करतात. अगरबत्तीचा व्यवसाय करत त्यांनी प्राणिमित्र म्हणून ओळख निर्माण केली आहे. शिवाय थॅलेसिमियाग्रस्तांच्या मदत करण्यात ते सरसावतात.
नामजोशी यांच्या वडिलांचा अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय. त्यांच्यासमवेत ते ठिकठिकाणी जायचे. न्यू पॅलेस परिसरात फेरफटका हमखास असायचा. तिथले प्राणी बघून नामजोशी यांना प्राण्यांबद्दल आस्था निर्माण झाली. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी अगरबत्ती व्यवसायात लक्ष घातले. सर्पमित्र म्हणून त्यांनी २००४ पासून कामाला सुरुवात केली. हे काम करताना शहरातल्या गल्लीबोळात वस्तीत आलेल्या सापाला त्यांनी पकडून जीवदान देण्याचे काम केले. आजवर त्यांनी २००० हून अधिक सापांना जीवदान दिले आहे.
मांजा दोऱ्यात अडकलेल्या घारी, वटवाघूळ, कबूतर व घुबड यांच्यावर उपचार करण्याचे त्यांचे काम आजही सुरू आहे. विजेचा झटका बसून जखमी झालेल्या माकडांवर त्यांनी उपचार केले. आजतागायत त्यांनी ८०० हून अधिक पक्षी व प्राण्यांवर उपचार केले आहेत. फाईट अगेन्स्ट थॅलेसिमिया आर्गनायझेशनचेही अध्यक्ष आहेत. कोरोना काळात थॅलेसिमिया रुग्णांना त्यांनी औषधे घरपोच पाठवली. ज्या जिल्ह्यात रुग्णांना रक्त मिळत नसेल, तेथे रक्तपेढ्यांशी समन्वय साधून रक्त उपलब्ध करून देतात. Blood @ 24×7 Group व्हाट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून गरजूंसाठी अर्ध्या तासात रक्त किंवा रक्तदाता उपलब्ध करून देत आहेत.

चौकट
व्हाईस ओव्हर अन् मिमिक्रीही
श्री. नामजोशी व्हाईस ओव्हर व मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काम करतात. त्यांनी गेल्या वीस वर्षांत अंधशाळा, बालकल्याण संकुल, कुष्ठधाम, हेल्पर्स आफ हॅन्डिकॕप्ड, सावली केअर, मातोश्री वृद्धाश्रम (चंबूखडी), करुणालय संस्था, कळंबा कारागृह, अंध वसतिगृह (हणबरवाडी), मातोश्री वृद्धाश्रम (आर.के. नगर), मध्यवर्ती कारागृहात मिमिक्रीचे कार्यक्रम सादर केले. लोकांच्या मदतीला धावताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले पाहिजे, ही त्यांची भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT