कोल्हापूर

घाटगे आणि करवीर संस्थानचे दृढ संबंध ः श्रीमंत शाहू महाराज

CD

81685

घाटगे आणि करवीर संस्थांनचे दृढ संबंध
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती; नंदीतादेवी घाटगे लिखीत दोन पुस्तकांचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.९ ः घाटगे घराणे आणि करवीर संस्थान यांचे संबंध पूर्वापार आहेत. करवीर संस्थांनचे दुसरे संभाजी महाराज आणि घाटगे घराणे यांची जवळीक अधिक होती. त्यानंतरच्या सर्वच पिढ्यांनी हे संबध वृद्धींगत केले, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. आज त्यांच्या प्रमूख उपस्थितीत नंदीतादेवी घाटगे लिखीत ‘घाटगेज द राईज ऑफ ए रॉयल डायनेस्टी’ आणि ‘बायजाबाई ज ज्वेल इन द मराठा क्राऊन’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. हॉटेल पॅव्हेलियनमध्ये सोहळा झाला.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, ‘घाटगे घराण्याला मोठा वारसा आहे. बहुतांशी मराठा घराणी राजस्थानातून दक्षिणेत आली. महाडिक, शिर्के, घाटगे, डफळे यांचाही त्यामध्ये समावेश आहे. घाटगे आणि शहाजीराजे भोसले आदिलशहाच्या दराहबारात होते. त्यांची मैत्री होती. घाटगे घराण्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे करवीर संस्थानात दत्तक आले. शाहू महाराजांनी आधुनिक भारताचा पाया रचला. करवीर संस्थानमधील दुसरे संभाजीराजे यांचे आणि घाटगे घराण्याचे संबंध अधिक जवळचे होते. पुढच्या पिढीतही ते वृद्धींगत झाले. नंदीतादेवी घाटगे यांनी लिहिलेल्या पुस्तकातून इतिहासातील अनेक पदर उलगडले आहेत.’
कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, ‘ घाटगे घराण्याला मोठा इतिहास आहे तो या पुस्तका संकलीत झाला. एखाद्या इतिहास संशोधकाला लाजवेल अशी संदर्भासहीत मांडणी केली आहे. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद व्हावा.’
नंदीतादेवी घाटगे म्हणाल्या,‘घाटगे घराणे मुळचे राजस्थानचे आहे. आदिलशहा, छत्रपती शिवाजी महाराज, ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश या सर्व शासनकर्त्यांशी त्यांचा संबंध आला. या घराण्याने अनेक पराक्रमी योद्धे देशाला दिले. हा सहाशे वर्षांचा इतिहास आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.’ शाहू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुशिलादेवी घाटगे, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, माजी आमदार अमल महाडिक हे उपस्थित होते.
शाहू उद्योग समुहाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी प्रास्ताविक केले. नवोदिता घाटगे यांनी आभार मानले.

चौकट
‘त्यांना’ शिवसेनेचे तिकीट मिळाले.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, ‘मी विक्रमसिंह राजे यांच्या आधी शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभेचे तिकीट मला मिळेल अशी मला आशा होती. पण, ते माझ्यानंतर शिवसेनेत आलेल्या राजे विक्रमसिंह घाटगे यांना मिळाले. तरीही आमचे संबंध मैत्रीचे होते.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू अन् भाजप-शिंदेसेनेचाही अर्ज, एकच तारखा; कुणाला मिळणार परवानगी?

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT