कोल्हापूर

मावळा कोल्हापूर शिवजयंती

CD

८३०८८

मिरजकर तिकटीला
आजपासून शिवविचारांचा जागर

‘मावळा कोल्हापूर’चे आयोजन ः डॉ. आ. ह. साळुंखे यांचा उद्या गौरव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः ‘वारसा विचारांचा, कृती जाणिवतेची’ हे ब्रीद घेऊन यंदाही मावळा कोल्हापूरच्या वतीने मिरजकर तिकटी येथे शिवजयंती उत्सव पारंपरिक उत्साहात होणार आहे. सलग चार दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले असून शुक्रवारी (ता. १७) यंदाचा मावळा गौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना प्रदान केला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष उमेश पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राहुल भोई, महेंद्र साळोखे, अमित नलवडे, प्रज्वल मोहिते, रोहित सावेकर, नामदेवराव यादव आदी उपस्थित होते.
उत्सवांतर्गत उद्या (गुरुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्‌घाटन होईल. सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असेल. शुक्रवार (ता.१७) पासून सायंकाळी साडेसहाला ‘प्रतापगडचा रणसंग्राम’ महानाट्याला प्रारंभ होईल. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा गौरव होईल. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे आदींची प्रमुख उपस्थिती असेल.
शनिवारी (ता. १८) सायंकाळी सात वाजता महानाट्याला प्रारंभ होईल. यावेळी माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, उदय फाळके, शाहू जाधव, राजू मेवेकरी, संदीप सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असेल. रविवारी (ता. १९) आमदार जयश्री जाधव, मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळा होईल. सायंकाळी सात वाजता महानाट्याचा प्रयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT