कोल्हापूर

संजय भोसले जामीन नामंजूर

CD

संजय भोसलेचा जामीन फेटाळला

दुपारी तीनच्या सुमारास सुनावणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः महापालिकेतील घरफाळा गैरव्यवहारातील फिर्यादीच संयशित आरोपी ठरलेल्या संजय शिवाजीराव भोसलेचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. त्याला काल न्यायालयाने सहा मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर भोसलेच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयात सुनावणी सुरू झाली. रात्री आठ वाजता न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.
याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याचे भोसलेच्या वकिलांनी सांगितले. तपास अधिकारी म्हणून उपनिरीक्षक इकबाल महात आणि सरकारी वकील एस. एम. म्हामुलकर यांनी बाजू मांडली. तिसरे सहदिवाणी न्यायाधीश एम. एम. पळसापुरे यांनी जामीन अर्ज फेटाळला.

संशयित आरोपी भोसले याला जामीन मिळू नये, यासाठी सरकार पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद करण्यात आला. भोसले हा तत्कालीन कर निर्धारक होता. त्याला गुन्ह्याची सर्व माहिती आहे. तसेच भोसले हा महापालिका कर्मचारी संघाचा गेली चार वर्षे अध्यक्ष आहे. पदाचा वापर करून तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. महत्त्वाचा पुरावा दुबळा करू शकतो, नष्ट करू शकतो. त्याने सरकारी करातून जमा केलेल्या रकमेत गैरव्यवहार केला आहे. यामध्ये संशयित आरोपी भोसले याचा सहभाग कसा आहे, त्याने तो गैरव्यवहार कसा केला, याचाही तपास करायचा आहे. त्याने फसवणूक केली आहे. तो लोकसेवक आहे. सरकारी कागदपत्रात त्याने फेरफार केला आहे. त्याच्यावर ४६ लाख २३ हजार ३० रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या काही केस लॉनुसार अशा अपहारात दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, आजन्म कारावास झाला आहे. त्‍याचीही माहिती म्हमुलकर यांनी न्यायालयाला दिली. तसेच, यापूर्वीच्या या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा जामीन जिल्हा व उच्च न्यायालयानेही फेटाळला असल्याचे निदर्शनास आणून दिले. साहाय्यक वकील उदयसिंह जगताप, पोलिस नाईक रणजित देसाई, प्रतीक शिंदे यांनी तपास अधिकाऱ्यांना आणि सरकारी वकिलांना सहकार्य केले.
दरम्यान, भोसलेचे वकील प्रकाश मोरे यांनी त्यांची बाजू मांडली. यामध्ये त्यांनी सांगितले, की भोसलेने कोणत्याही रकमेचा अपहार केलेला नाही. केवळ चुकीच्या पद्धतीने कर आकारणी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुरावे नष्ट करणे किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रश्‍नच येत नाही. तसेच, भोसलेला पंधरा दिवस महापालिकेत जाण्यासाठी बंदी करावी, पंधरा दिवस पोलिस ठाण्यात हजेरी लावावी; पण जामीन मंजूर करावा, अशीही विनंती केली.
माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी संबंधित घरफाळ्यातील गैरव्यवहारात फिर्यादी भोसले हाच आरोपी असल्यासंदर्भातील कागदपत्रे उच्च न्यायालयात दिली होती. त्यांच्या बाजूने आज ॲड. अभिजित देसाई यांनीही जामीन मिळू नये अशी बाजू मांडली. जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. अपहार प्रकरणातील प्रक्रियेत त्याने कोणतीही बाजू स्वतःहून मांडली नाही. त्याला कारणे दाखवा नोटीस दिली होती. यासह अन्य संदर्भ न्यायालयात दिल्याचे ॲड. देसाई यांनी सांगितले.
दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत पोलिस, वकील आणि महापालिकेशी संबंधित निकालाच्या प्रतीक्षेत होते. रात्री आठ वाजता जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे आता संजय भोसले याचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
---------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT