कोल्हापूर

आजरा ः बिबट्याची दहशत

CD

पेरणोली परिसरात बिबट्याची दहशत
दोन कुत्र्यांचा पाडला फडशा ः भीतीचे वातावरण


आजरा, ता. २८ ः पेरणोलीपैकी नावलकरवाडी (ता. आजरा) परिसरात बिबट्याने दहशत माजवली आहे. गेले चार दिवस तो या परिसरात वावरत आहे. त्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
चार दिवसांपूर्वी मध्यरात्री बिबट्याने महादेव नावकर यांच्या कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला केला. त्याच्या ओरडण्याने अरविंद नावलकर यांच्या घरासमोर राखण करत असलेले कुत्रे जागे झाले. ते बिबट्यावर चालून गेले. त्यालाही बिबट्याने पळवले. बांबूच्या वनात बिबट्याने त्याचा फडशा पाडला. या घटनेनंतर बिबट्याने दोन दिवसांपूर्वी दयानंद सासूलकर यांचे कुत्रेही पळवले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या या परिसरात वावरत असून, रात्रीच्या वेळी तो नावकरवाडीनजीक येत असतो. तो आला की रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाज मोठ्याने येत असल्याचे ग्रामस्थ संताजी सोले यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी राखणीला जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पायाचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला.
....

* बांबू व्यापाऱ्याला बिबट्याचे दर्शन

येथील एका शेतकऱ्याचा मेसकाठी (बांबूचा) अड्डा बांबू व्यापारी नामदेव कुकडे यांनी घेतला आहे. कुकडे हे नावकरवाडीकडे जात असताना वाटेत त्यांना बिबट्या जंगलाच्या दिशेने पळताना दिसला. याबाबतची कल्पना त्यांनी बांबू कामगारांना दिली व काम करताना दक्षता बाळगण्याची सूचना केली.

...

* आधी वाघ, नंतर बिबट्या

पेरणोलीच्या जंगलात वाघ आला आहे. त्याचा वावर महागोंड, अरळगुंडी, चिमणे परिसरात आहे. त्याने आठवड्यापूर्वी हरपवडे धनगरवाड्यावर म्हैस ठार केली आहे. त्यानंतर या परिसरात बिबट्याचेही आगमन झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू अन् भाजप-शिंदेसेनेचाही अर्ज, एकच तारखा; कुणाला मिळणार परवानगी?

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT