कोल्हापूर

शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्या

CD

87334
आजरा ः येथील माहेर हॉस्पिटलमध्ये जनआरोग्य योजनेच्या प्रारंभप्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मार्गदर्शन केले. अशोक चराटी, कॉ. संपत देसाई, डॉ. बर्नाड गॉडद, डॉ. बर्नडेट गॉडद आदी उपस्थित होते.
----------------------
शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्या
आमदार आबिटकर : आजऱ्यात जनआरोग्य योजनेचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १२ : सर्वसामान्यांसाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या आहेत. जनतेच्या आरोग्याची होणारी हेळसांड होऊ नये यासाठी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही याचाच एक भाग आहे. डॉ. गॉडद दाम्पत्याच्या प्रयत्नातून आजऱ्यामध्ये गोरगरीब जनतेसाठी आरोग्यविषयक नवे दालन सुरू होत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
येथील माहेर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या उद्‍घाटनप्रसंगी आमदार आबिटकर बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘अलीकडे उपचारांअभावी रुग्णांची फरफट होताना दिसते. मुळातच आजारांचे प्रकार इतके वाढले आहेत की, निदान होईपर्यंत व झाल्यावर रुग्णांना औषधोपचारासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. खर्च करण्याची क्षमता नसल्यामुळे अनेकांना उपचारापासून वंचित राहावे लागते. यासाठी रुग्णांनी शासकीय रुग्णालयांना प्राधान्य द्यावे व तेथून उपचार घेतल्यास अत्यंत कमी खर्चात चांगल्या पद्धतीने उपचार होणे शक्य आहे. त्यातूनही ज्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावयाचे आहेत त्यांनी प्रथम त्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा आहे का, याची शहानिशा करून त्यानंतरच उपचारास प्राधान्य द्यावे.’
तहसीलदार विकास अहिर, नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, कॉ. संपतराव देसाई, सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, नीलेश घाटगे, संजय पाटील, विजय थोरवत, संतोष भाटले, अश्विन डोंगरे, डॉ. रिया गॉडद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. बर्नाड गॉडद यांनी स्वागत केले. डॉ. बर्नडेट गॉडद यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT