कोल्हापूर

लिंगायत रुद्र भूमीसाठी १५ लाख देऊ; हसन मुश्रीफ

CD

87677
गडहिंग्लज : लिंगायत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापण्याची मागणी केल्याबद्दल हसन मुश्रीफ यांचा लिंगायत समाजातर्फे कृतज्ञतापर सत्कार केला.

लिंगायत रुद्र भूमीसाठी
१५ लाख देऊ : मुश्रीफ
महामंडळ स्थापनेच्या मागणीबद्दल कृतज्ञतापर सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : शहरातील लिंगायत समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी म्हणजेच रुद्र भूमीसाठी निधीची मागणी केली. त्यानंतर मुश्रीफ यांनी तात्काळ गडहिंग्लज नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना पत्र देऊन १५ लाख रुपये निधीचा प्रस्ताव स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत देण्याची सूचना केली.
येथील लिंगायत समाजाच्यावतीने आमदार हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार झाला. त्यावेळी रुद्र भूमीचा प्रश्‍न मांडण्यात आला. दरम्यान, श्री. मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची सूचना करुन त्याद्वारे बिनव्याजी कर्जपुरवठा व अनुदान मिळावे, अशी मागणी केली आहे. त्या कृतज्ञतेपोटी लिंगायत समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी श्री. मुश्रीफ म्हणाले, या अधिवेशनात या मागणीचा विचार होऊन अर्थसंकल्पामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा व तरतूद व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. समाजातील बेरोजगार युवक- युवतींच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी ओबीसी, मराठा, मागासवर्गीय, मातंग समाज, भटक्या जाती जमाती, मुस्लिम समाज आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्‍वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे.
या वेळी किरण कदम, हारुण सय्यद, सुरेश कोळकी, सतीश पाटील, लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी, अमरनाथ घुगरी, बाळासाहेब घुगरी, अरुण बेल्लद, विजय बनगे, रामगोंड उर्फ गुंडू पाटील, डॉ. मल्लाप्पा बेळगुद्री, राजशेखर यरटे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT