कोल्हापूर

भारत ॲग्रो

CD

‘ॲग्रोवन’च्या राजकुमार चौगुले यांना
आदर्श कार्यगौरव पुरस्कार जाहीर

बामणी येथे आज राज्यस्तरीय ऊस विकास परिषद

कोल्हापूर, ता. ११ ः महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ, भारत ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या वतीने राज्यस्तरीय ऊस विकास परिषद व महाराष्ट्र ऊसभूषण कार्य गौरव पुरस्कार वितरण समारंभ उद्या रविवारी (ता. १२) होणार आहे. आर. के. मंगल कार्यालय बामणी (ता. कागल) येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात ‘सकाळ ॲग्रोवन’चे प्रतिनिधी राजकुमार चौगुले यांना आदर्श कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती भारत ॲग्रोचे अध्यक्ष सत्यजित भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल नाना माने - पाटील प्रमुख उपस्थित असणार आहेत. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. शेती समस्या वाढत आहेत. यातून मार्ग काढण्यातून शेतीला पुन्हा चांगले दिवस यावेत, सेंद्रीय शेतीचा वापर वाढावा, याबाबत ऊस परिषदेत मार्गदर्शन होणार आहे. या ऊस परिषदेत कृषिरत्न डॉ. अरुण मराठे, संजीव माने, ऊस विकास अधिकारी उत्तम परीट, संतोष लहाने हे मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेशतर्फे महाराष्‍ट्र आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार राजकुमार चौगले व शिवाजी हळणवर (ईश्वर वठार ता. पंढरपूर जि. सोलापूर) यांना देण्यात येणार आहे. राज्य ऊस भूषण कार्य गौरव पुरस्काराचे वितरण दुपारी दोन वाजता होणार आहे. या पुरस्कारासाठी कृष्णात पाटील (लिंगनूर), उत्तम परीट (शेंडूर), कृष्णात पाटील (सागाव), बापूसोा आवटे (वरुण कोडोली), डॉ. जनार्धन पाटील (जाधववाडी) यांची निवड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT