कोल्हापूर

संविधान महाजलसा

CD

88702
कोल्हापूर : दसरा चौकातील मैदानावर अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे आयोजित ‘सलाम संविधानाचा महाजलसा’ कार्यक्रमात गाणी सादर करताना गायक.


साऱ्या विश्‍वाला बुद्ध हवा...
सलाम संविधानाचा महाजलसा कार्यक्रम; प्रबोधनपर गीतांतून जागर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : ‘दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर...एक रायगडावर, एक चवदार तळ्यावर’ तर ‘माझ्या भीमाची पुण्याई, साऱ्या विश्‍वाला बुद्ध हवा,’ यासह अनेक सुमधुर गाण्यांनी आज अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनच्या ‘सलाम सविधान’ या प्रबोधनपर गीतांचा महाजलासा साजरा झाला.
फाउंडेशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त दसरा चौकातील मैदानावर हा महाजलसा आयोजित केला होता. अश्‍वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशन आणि श्रावस्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे याच कार्यक्रमात ‘जय भीम बोल’ या गीताचा लोकार्पण सोहळाही झाला. या वेळी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ३० व्यक्तिंना अश्‍वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे सन्मानित केले. हा महाजलसा पाहण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरून श्रोते उपस्थित होते. गायक कबीर नाईकनवरे आणि ‘संविधान गीत’ फेम मुंबई येथील प्रविण डोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाजलसा रंगत गेला. भीम गीतांच्या कर्णमधुर तालावर अखंड जनसमुदाय डोलला.
निवेदक प्रवीण बनसोडे यांनी बहारदार निवेदन सादर करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती दिली. गायक मंदार पाटील, गायिका सई लकडे, रविराज सदाजय, ओमकार कांबळे, दर्शन सुतार, आकाश शिंदे, विश्‍वनाथ चौगुले, ओंकार भिसे, सचिन देसाई, रोहन मस्के, अभिजीत लोखंडे, अन्सार इनामदार या कलाकारांनी हा ‘संविधानाचा जागर’ केला. ‘शिवरायांनी शिकवला तलवारीचा घाव, महात्मा फुल्यांनी शिकवला ज्ञानाचा प्रवाह, या भीमरायांनी शिकवला प्रेम बंधुभाव...’, ‘माझी आजी म्हणायची ही ओवी जात्यावर, भीम बनला सावली...’, अशी अनेक बहारदार गाणी सादर केली.
संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान, बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट, बुद्ध गार्डन संवर्धन विकास सेवा संस्था, ब्लू लाईन फाउंडेशन, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, युवा बौद्ध धम्म परिषद यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT