कोल्हापूर

जयसिंगपूर पालिकेचे कामकाज सुरू

CD

जयसिंगपूर पालिकेचे कामकाज सुरू
कर्मचाऱ्यांची संपातून माघार; कामे मार्गी लावण्यासाठी नागरिकांची गर्दी
जयसिंगपूर, ता. १७ः येथील पालिका कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्याने शुक्रवारपासून सर्वच विभागाचे कामकाज सुरु झाले. कर्मचारी कामावर रुजू झाल्याने पालिकेत खोळंबलेली कामे मार्गी लावण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली.
चार दिवसांपासून पालिका कर्मचारी आपल्या मागणीसाठी संपात सहभागी झाले होते. महाराष्ट़ नगरपरीषद कर्मचारी आणि संवर्ग कर्मचारी संघटनेचे सदस्य असणाऱ्या येथील पालिकेचे कर्मचारी संपात सहभागी झाले. यामुळे नागरीकांची गैरसोय झाली. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाचे काम पर्यायी यंत्रणेमार्फत सुरु ठेवले. कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत अन्य विभागांचे काम सुरु होते. मात्र कामे पूर्ण करण्यात मर्यादा होत्या. संघटनेच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चेचे आश्वासन दिले आहे. याप्रश्नी २३ मार्चला बैठकीचेही आश्वासन दिले आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलनातून माघार घेण्याची भूमिका घेतली. त्यानुसार शुक्रवारपासून पालिका कर्मचारी कामावर हजर झाले. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली. तसेच पालिका शाळांतील शिक्षकही जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपात सहभागी झाले होते. मात्र यातील काही शिक्षकांनीही कामावर रुजू होण्याची भूमिका घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT