कोल्हापूर

अमल महाडिक यांचा

CD

डी.वाय.कारखान्यातून लुटलेले
अडीचशे कोटी गेले कोठे ?

अमल महाडिक :राधानगरी तालुक्यात सभासदांच्या भेटीगाठी

कोल्हापूर, ता. ७ : ‘डी. वाय. पाटील कारखान्याने को-जनरेशन आणि उपपदार्थ विक्रीतून गेल्या बारा वर्षांत मिळवलेले सुमारे अडीचशे कोटी रुपये गेले कुठे? ’, असा सवाल माजी आमदार अमल महाडिक यांनी विरोधकांना केला. राजाराम कारखाना आणि डी. वाय. पाटील कारखाना यांच्यातील गेल्या बारा वर्षांच्या दराचा तुलनात्मक आढावा घेत श्री. महाडिक यांनी हा आरोप केला. राजाराम कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी अमल महाडिक राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी सभासदांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
अमल महाडिक म्हणाले, ‘राजाराम कारखान्याकडे उत्पन्नाचा कोणताही इतर मार्ग नसताना सभासदांना डी. वाय. पाटील कारखाच्या बरोबरीने दर दिला आहे. अनेक वेळेला डी. वाय. पाटील कारखान्यापेक्षाही जास्त दर दिला आहे. को-जनरेशन आणि इतर उपपदार्थ निर्मिती यंत्रणा असूनही डी.वाय.कारखान्याने तुलनेने कमीच दर दिला आहे. गेल्या बारा वर्षांचा विचार केला तर जवळपास अडीचशे कोटी रुपये को जनरेशन आणि उपपदार्थ विक्री मधून डीवायला जास्तीचे मिळाले असतील. पण हे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या झोळीत न जाता कुणाच्या खिशात गेले? याचे उत्तर विरोधकांनी द्यावे. राजाराम कारखान्याचा कारभार पारदर्शक असून केवळ संभ्रम पसरवण्यासाठी विरोधकांची बॅनरबाजी चालली आहे. पण अशा पोस्टर बॉईजना सुज्ञ सभासद थारा देणार नाहीत.’
कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले, ‘राजाराम कारखान्याचे दोन वेळा अध्यक्षपद भोगलेल्यांना निवडणुकीच्या तोंडावरच हुकूमशाहीची जाणीव कशी झाली? सर्जेराव माने यांचा पूर्वइतिहास पाहता निवडणुकीनंतर त्यांनी आमचे पाय धरायला येऊ नये.’
यावेळी दत्तात्रय निले, राजाराम मोरे, गोविंदा चौगुले, पवन महाडिक, विजय महाडिक, मारुती चौगले, चंद्रकांत पाटील, प्रकाश डेळेकर, शामराव चौगले, महादेव चौगले, आनंद धनवडे, महेश निल्ले, शरद लिंग्रज विजय ढेरे, मारुती पाटील यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT