कोल्हापूर

आर्थिक नियोजनाचा ''बॉयलर'' पेटला, पण..!

CD

आर्थिक नियोजनाचा ''बॉयलर'' पेटला, पण..!
गोडसाखर कारखाना; व्यवस्थापनाचा पाठपुरावा सुरुच, आशादायी चित्राकडे डोळे
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना (गोडसाखर) सुरु करण्यासाठी व्यवस्थापनाने आर्थिक नियोजनाचा बॉयलर पेटवला आहे. पण केडीसीसीने तत्वत: मंजूर केलेल्या कर्जाला साखर आयुक्तांकडून आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळवावी लागणार आहे. यंदाचा हंगाम कोणत्याही परिस्थितीत सुरु करायचा, यासाठी व्यवस्थापनाचा पाठपुरावा सुरु असून यातून निर्माण होणार्‍या आशादायक चित्राकडे आता शेतकर्‍यांचे डोळे लागले आहेत.
आर्थिक अडचणीमुळे गतवेळचा कारखान्याचा हंगाम सुरु होवू शकला नाही. दरम्यान, निवडणुकीत सत्तेवर आलेल्या नव्या संचालक मंडळाकडून आगामी हंगामाची तयारी सुरु झाली. कारखान्याचे आधुनिकीकरण आणि इथेनॉल प्रकल्प उभारणीचा डीपीआर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून करुन घेतला. हा २०० कोटींचा प्रकल्प आराखडा कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश शहापूरकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण व संचालकांना आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील केडीसीसी बँकेला सुपूर्द केला. त्यानंतर बँकेच्या पथकाने स्थळ पाहणी केली.
दरम्यान, गेल्या महिन्यात बँकेने ७२ कोटींच्या अर्थसहाय्यला तत्वत: मंजूरी दिली आहे. कर्जासाठी अनेक नियम व अटी आहेत. कर्जासाठी शासनाकडून आर्थिक व प्रशासकीय मान्यता आणण्याची असलेली अट ही त्यापैकीच एक आहे. त्यासाठी पुन्हा कारखान्यातर्फे प्रयत्न सुरु झाले. मुख्य लेखापरीक्षकांकडून हा प्रस्ताव प्रादेशिक साखर संचालकांकडे पोहचला असून त्यांच्या शिफारशीने आयुक्तांकडे जातो. आयुक्तांकडेच मान्यतेचे अधिकार आहेत. या मान्यतेसाठी आता कारखाना व्यवस्थापनाला धडपडावे लागणार आहे. येणाऱ्‍या गळीत हंगामात कारखान्याचा बॉयलर पेटवण्यासाठी व्यवस्थापनाने आधी आर्थिक नियोजनाचा बॉयलर पेटवला आहे. बँका आणि शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. विशेष म्हणजे इतर तीन बँकांशीही केडीसीसी बँकेच्या पथकाकडून चर्चा सुरु झाली आहे. सर्व बँकांकडून अर्थसहाय्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. आगामी गळीत हंगाम सुरु होण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी आहे. या कालावधीत काहीही करुन अर्थसहाय्य उपलब्ध करावे लागणार आहे. त्याच अनुषंगाने कारखाना व्यवस्थापनाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.
-----------------
भाजपचा लाभ होईल ?
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. शहापूरकर व उपाध्यक्ष श्री. चव्हाण दोघेही तालुक्यातील भाजपचे प्रमुख आहेत. राज्य सरकारमध्ये सहभागी भाजप नेत्यांकडे पाठपुरावा केल्यास आयुक्तांकडील मान्यता आणणे सोपे जाणार आहे. तालुक्यातील या दोन्ही नेत्यांनी आता गोडसाखरची चिमणी पेटवण्यासाठी भाजपचा लाभ घेण्यास पुढे सरसावणे गरजेचे असून शेतकऱ्‍यांचे डोळे सकारात्मक व आशादायी चित्राकडे लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT