कोल्हापूर

शहापूरकर पत्रकार परिषद

CD

''गोडसाखर''ला अर्थसहाय्याचा हात

जिल्हा बँक देणार १०२ कोटी : १५ मे पासून तोडणी-वाहतुकीचे करार होणार

गडहिंग्लज, ता. ८ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याला (गोडसाखर) जिल्हा बँकेने अर्थसहाय्याचा हात दिला आहे. १०२ कोटी ४० लाखांच्या कर्जाला मंजुरी दिली असून यातील ३० कोटींची रक्कम चार दिवसांत मिळेल. त्यानंतर १५ मे पासून आगामी हंगामासाठी तोडणी व वाहतूकदारांचे करार सुरु होतील, अशी माहिती अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मे अखेरपर्यंत करार झालेल्यांच्या खात्यावर पहिला हप्ताही जमा करणार असल्याचे ते म्हणाले.
डॉ. शहापूरकर म्हणाले, ‘तांत्रिकदृष्ट्या कारखाना नाजूक आहे. यामुळे ''व्हीएसआय''च्या मार्गदर्शनाने इथेनॉल व कारखाना आधुनिकीकरणाचा तयार केलेला ३१४ कोटींचा आराखडा जिल्हा बँकेला सादर केला. परंतु सुरुवातीला इतके कर्ज कारखान्याला परवडणारे नव्हते. म्हणून तिघा तज्ज्ञ तांत्रिक समितीच्या मार्गदर्शनाने कमीतकमी खर्चात कारखाना सुस्थितीत चालवण्याचे नियोजन केले. यंदा पहिल्या टप्प्यात रोज ७० हजार लिटर इथेनॉल निर्मिती आणि प्रतिदिन ३००० ते ३२०० मे. टन ऊस गाळपाचे नियोजन आहे. कारखाना वेळेत सुरु करण्यासाठी ३० कोटींचे पूर्वहंगामी अर्थसहाय्य तातडीने देण्याची ग्वाही बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.’
ते म्हणाले, ‘दुसऱ्या टप्प्यात रोज ५५०० मे. टन उसाचे गाळप व दोन ते अडीच लाख लिटर इथेनॉल निर्मितीचे नियोजन आहे. हा टप्पाच कारखान्याचा टर्निंग पाँईट ठरणार आहे. कारखाना ७० कोटींच्या तोट्यात असून ७७ कोटींची देणी आहेत. या टप्प्यातच कारखान्याचे उत्पन्न व नफा वाढवून आजी-माजी कामगारांसह इतर सर्व देणी देणार आहे.’ पुढील निवडणुकीच्या आधी प्रत्येक सभासदांना एकेक क्विंटल साखर भेट देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, कार्यकारी संचालक ए. आर. ताबे, सचिव मानसिंग देसाई व संचालक उपस्थित होते.
...


हसन मुश्रीफ यांची साथ...

डॉ. शहापूरकर म्हणाले, ‘कारखान्याला अर्थसहाय्यासाठी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत, इतर सहकारी व खासगी बँकांचे उंबरे झिजवले. परंतु, गोड बोलण्यापलिकडे त्यांच्याकडून सकारात्मक असा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केडीसीसीद्वारे अर्थसहाय्य करुन कारखान्याला साथ दिली.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयुष चावलाने हैदराबादला दिला मोठा दणका! धोकादायक ट्रेविस हेडला धाडलं माघारी

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT