कोल्हापूर

सांडपाणी प्रकल्प तपासणी

CD

(सकाळ इम्पँक्ट लोगो वापरावा)

गृहप्रकल्प, दवाखान्यांच्या
एसटीपीची तपासणी होणार
‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम; बंद प्रकल्पांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : शहरातील बहुतांशी गृहप्रकल्पातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने रविवारी (ता. ७) प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शुक्रवार (ता. १२) पासून गृहनिर्माण संस्था, हॉस्पिटल, हॉटेलच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रकल्प बंद आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग व नगररचना विभाग हे संयुक्तपणे ही तपासणी करणार आहेत.
शहरातील गृहप्रकल्प, हॉटेल, दवाखाने यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी) बसवणे नगररचना कायद्यांतर्गत करणे बंधनकारक आहे. बांधकामाच्या आराखड्यात एस.टी.पी प्रकल्पाचा समावेश करून तो प्रत्यक्षात बसवल्याशिवाय इमारतींना कंप्लिशन आणि आक्युपाय प्रमाणपत्र दिले जात नाही. असे असले तरी शहातील बहुतांशी इमारतींचे एस.टी.पी प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत किंवा बंद आहेत. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने सुमारे ३९ इमारतींच्या सचिवांना एस.टी.पी प्रकल्प बंद असल्याबाबत नोटीस पाठवली होती. मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. त्यामुळे या एस.टी.पी प्रकल्पांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
------------------------
चौकट
सोसायटीची जबाबदारी
बहुतेक गृहप्रकल्पांचे रुपांतर सोसायटीत झाले असून त्यांचे संचालक मंडळ अस्तित्वात आहे. इमारतींमधील अन्य सुविधांप्रमाणेच एस.टी.पी प्रकल्पांची देखभाल दुरूस्तीही संचालक मंडळाची जबाबदारी आहे. त्यामुळे याबाबतची नोटीस ही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाच देण्यात येईल. अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT