कोल्हापूर

बस मधून अडीच लाखांचे दागिणे लंपास

CD

अडीच लाखांच्या ऐवजावर डल्ला
---
बसमध्ये जागा पडकण्यासाठी ठेवलेली बॅग पळविली
कोल्‍हापूर, ता. ११ ः कोल्हापूर-इस्लामपूर बसमध्ये जागा पडकण्यासाठी दोन लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज असलेली खिडकीतून ठेवलेली बॅग चोरट्याने पळविली. मध्यवर्ती बसस्थानकात मंगळवारी (ता. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याची फिर्याद इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील अश्‍विनी सतीश खांबे यांनी काल (ता. १०) शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. अज्ञात चोरट्याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः फिर्यादी अश्‍विनी खांबे व भाऊ सुमीत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूर-इस्लामपूर बसमध्ये सीट पकडण्यासाठी खिडकीतून दागिने, रोख रक्कम अशी बॅग ठेवली. ती अज्ञातांनी चोरली. या बॅगमध्ये ५५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, दहा ग्रॅमचा सोन्याचा गुंज, पाच ग्रॅमचे कानातील टॉप्स, एक मोबाईल हॅण्डसेट आणि चार हजार रुपये रोख असा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
सुट्यांचा हंगाम असल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी आहे. तेथे चोरांचा सुळसुळाट असल्याचे दिसते. येथे पोलिसांनी आणखी गस्त, बंदोबस्त वाढविण्याची गरज आहे. याबाबत महिलांच्या एका शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांनाही याचे निवेदन दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT