कोल्हापूर

गड-तलवार हल्ला

CD

प्रेमविवाहाच्या रागातून तलवार हल्ला

गडहिंग्लजमधील घटना : परस्परविरोधी फिर्यादी, दोघे जण जखमी

गडहिंग्लज, ता. १३ : प्रेमविवाह केल्याच्या रागातून तलवार हल्ला केल्याची घटना येथील भीमनगरात घडली. यात दोघे जण जखमी झाले आहेत. परस्परविरोधी फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता.१२) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, रोहित रमेश सलवादे याने प्रेमविवाह केला आहे. शुक्रवारी रात्री रोहित जेवत असताना त्याच्या पत्नीचे मामा पवन तरवाळ, अक्षय तरवाळ व चुलता संभाजी तरवाळ घरात आले. पवनच्या हातात तलवार होती. त्यामुळे घाबरुन रोहित बेडरुममध्ये गेला. यावेळी पवनने तलवार मारली. यात रोहितच्या डाव्या डोळ्याच्या वरील बाजूला जखम झाली आहे. तर संभाजीने रोहितला धरल्यानंतर अक्षयने पोटात बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबतची फिर्याद रोहितने दिली असून पवन, अक्षय व संभाजीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे अधिक तपास करीत आहेत.
तर संभाजी तरवाळ यांच्या फिर्यादीवरुन रोहित सलवादे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी यांच्या मुलीला, तू दहावी पास कशी काय झालीस? पास होण्याच्या लायकीची नव्हतीस, असे रोहित फोनवरुन बोलला. याचा जाब विचारत असताना रोहितने संभाजी यांना, तू कोण विचारणारा, असे म्हणून तलवार मारली. यात संभाजी यांच्या डाव्या हाताच्या मटगटावर जखम झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT