कोल्हापूर

महापूर सावधगीरी

CD

जलआयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याची वेळ

जलतज्ज्ञ विजयकुमार दिवाण; महापूर टाळण्यासाठी कोयना, वारणा धरणातील पाणीसाठा कमी करणे गरजेचे

कोल्हापूर, ता. २० : ‘पाऊस जास्त झाल्यास कोल्हापूर, सांगलीवर येणाऱ्या महापुराचे संकट टाळण्यासाठी केंद्रीय जलआयोगाने दिलेल्या निर्देशांचे अचूक पालन करण्याची वेळ आली आहे. त्यानुसार कोयना व वारणा धरणातील पाण्याचा साठा आणखी कमी करण्यावर जलसंपदा विभागाला भर द्यावा लागेल. या दोन्ही धरणात सध्या २० ते २६ टीएमसी पाणी असून तो साठा दहा टक्के ठेवावा लागेल. यासाठी शासनाकडे सावधगिरीचा भाग म्हणून पाठपुरावा करीत आहोत,’ अशी माहिती निवृत्त उपअभियंता जलतज्ज्ञ विजयकुमार दिवाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
२०१९ व २०२१ ला आलेल्या दोन्ही वेळच्या महापुरात कोल्हापूर व सांगली दोन्ही शहरे तसेच जवळपास १२०० हून अधिक गावांत महापुराचे पाणी शिरले. याच काळात महापुरात वाढणाऱ्या पाण्याची पातळी, धरणातील पाणीसाठा व उपाययोजनांचा श्री. दिवाण यांनी अभ्यास करून शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याची अंमलबजावणी झाली. त्यानुसार गतवर्षी महापुराचे संकट टळण्यास मदत झाली होती.
श्री. दिवाण म्हणाले की, ‘केंद्रीय जलआयोगाने महापुराचे संकट टाळण्यासाठी धरणातील पाणीसाठा येत्या १ जून अगोदर धऱणाच्या एकूण क्षमतेपेक्षा दहा टक्केच शिल्लक राहील, एवढे पाणी ठेवावे, अशी सूचना केली आहे. मात्र यंदा कोयना व वारणा धरणातील पाण्याचा साठा सध्या २६ टक्क्यांवर आहे. एवढा पाणी साठा येत्या एक जूनपर्यंत कमी करण्याचे आव्हान समोर आहे. त्यासाठी धरणातील सध्याचा पाणी साठा वीज निर्मितीसाठी वापरून त्यातून शासनाने महसूल मिळवावा. तसेच जूनपर्यंत पाणी आणखी कमी होईल. त्यानंतर जास्त पाऊस पडला तरी कोयना, वारणा धरणातील पाण्याची फुग कृष्णा, वारणा व पंचगंगा नदीवर येऊन महापुराचे संकट ओढावणार नाही.’
ते पुढे म्हणाले, ‘रोहिणी नक्षत्राच्या पूर्वी या तिन्ही नद्यांच्या क्षेत्रात असलेले बंधाऱ्यावरील बर्गे काढावेत तसेच कर्नाटकांतील हिप्परगी धरणातील बर्गेही तळापासून काढावेत. जेणेकरून पाणी तटून त्याची फूग निर्माण होऊन महापूराचे संकट ओढावणार नाही.केंद्रीय जल आयोगाच्या सूचनेनुसार महाराष्‍ट्र व कर्नाटक राज्यातील जलअभियंते व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक एक जूनपूर्वी कोल्हापूर किंवा सांगलीत घ्यावी. असा जेणेकरून पुराचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना स्थानिक लोकांना समजून शकतील.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घसरले; तीन दिवसात गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटींचे नुकसान

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

SCROLL FOR NEXT