कोल्हापूर

ऐनापूर ग्रामपंचायतीत प्रशासक येणार

CD

ऐनापूर ग्रामपंचायतीत प्रशासक येणार
उपसरपंचासह पाच सदस्यांचा राजीनामा; चौघेच कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : पोटनिवडणूक होऊन आठ दिवसांचा कालावधीही अद्याप उलटला नसताना ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीतील सत्तारूढ गटाचे उपसरपंच ईश्‍वर देसाई यांच्यासह पाच सदस्यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक येण्याचे ठळक संकेत आहेत.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या कुराडे गटाने सत्ता मिळवली. ओबीसी महिलांसाठी राखीव सरपंचपदावर उषा मांगले यांची निवड झाली; मात्र काही कारणामुळे सत्ताधाऱ्‍यांशी बिनसल्याने मांगलेंनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गेल्याच आठवड्यात झालेल्या पोटनिवडणुकीत मांगले पुन्हा निवडून आल्या. दरम्यान, काल (ता. २३) सत्तारूढ गटाचे सदस्य प्रवीण पोवार, समिना मकानदार, आशा कुराडे, सविता चौगुले यांनी सरपंचपदाचा कार्यभार असणारे उपसरपंच ईश्‍वर देसाई यांच्याकडे राजीनामा दिला. आज त्यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. त्यानंतर श्री. देसाई यांनीही गटविकास अधिकाऱ्‍यांकडे राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे नऊपैकी पाच सदस्यांनी राजीनामा दिल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक अटळ असल्याचे सांगितले जाते.
-----------
चार सदस्यांचा राजीनामा मंजूर झाल्याचे कळते. उपसरपंचही राजीनामा देणार असल्याचा निरोप असला तरी दुपारपर्यंत तरी राजीनामा आला नव्हता. एकूण सदस्य संख्येच्या ५० टक्केपेक्षा कमी सदस्य कार्यरत असतील तर प्रशासकाची नेमणूक होते. उपसरपंचांनीही राजीनामा दिल्यास ऐनापुरात नऊपैकी चार सदस्यच कार्यरत राहतील. यामुळे प्रशासकांची नेमणूक होऊ शकते.
- शरद मगर, गटविकास अधिकारी, गडहिंग्लज.
------------
मांगले यांची कोंडी
पहिल्यांदा कुराडे गटाकडून निवडून आलेल्या उषा मांगले पोटनिवडणूक मात्र विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृतने लढल्या. त्यात मांगलेच विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव सरपंचपदावर पुन्हा त्याच विराजमान होणार असल्याने विरोधी गटात उत्साह असतानाच उपसरपंचासह पाच सदस्यांच्या राजीनामा अस्त्राने त्यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT