कोल्हापूर

कांदा झाला स्वस्त

CD

कांद्याची आवक वाढली, भाव पडले
---
शाहू मार्केट यार्ड; सरासरी दर ८० रुपये दहा किलो
कोल्हापूर, ता. २७ ः शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने भाव पडले आहेत. सरासरी भाव ८० रुपये दहा किलो असा आहे; तर किरकोळ बाजारपेठेत अद्याप १५ ते २५ रुपये एक किलो भावात विकला जात आहे. येत्या आठ-दहा दिवसांत आवक वाढतच राहिली, तर भाव आणखी खाली येण्याची शक्यता आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान, तर ग्राहक व व्यापाऱ्यांचा लाभ अशी स्थिती झाली आहे.
येत्या दहा दिवसांवर मृग नक्षत्र आले आहे. त्याबरोबर पावसाची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बहुतांश शिल्लक कांदा बाजारपेठेकडे पाठविला आहे. राज्यातील लासलगाव (जि. नाशिक), पुणे बाजारपेठेत कांद्याचे भाव पडले. दोन- चार रुपये भाव कोल्हापुरात चांगला मिळतो, रोखीने पैसे मिळतात, म्हणून बहुतांश कांदा उत्पादकांनी आपला कांदा कोल्हापूरच्या बाजारपेठेत आणण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे १५ दिवसांपासून मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत रोज २० ते २५ गाड्या कांदा आवक होत आहे. कोल्हापुरात आलेल्या कांद्याचे सौदे झाल्यावर हा माल केरळ, कर्नाटक, गोव्यात पाठविला जातो.
गोवा व केरळातील पर्यटन हंगाम सध्या मावळतीला गेला. हॉटेलमधील ग्राहक कमी होत आहेत. त्यामुळे कांद्याची मागणीही कमी होत आहे. अशात येथील बाजारपेठेत आवक सतत सुरू असल्याने कांद्याचे भाव पडले आहेत.
येथील बाजारपेठेत सध्या भिगवण, नातेपुते, श्रीगोंदा, राशीन, बारामती, जेजुरी, लोणंद, दहीवडी या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा माल येत आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी पुरेशा प्रमाणात जाळ्या नाहीत किंवा जागा नाही. असा माल पावसात भिजला तर खराब होणार आहे. तेव्हा होणारे नुकसान टाळण्यासाठी कांदा बाजारपेठेत आणला जातो, अशी माहिती कांदा उत्पादक शेतकरी बाबासाहेब चव्हाण (रा. भिगवण) यांनी दिली.
..

घाऊक बाजारपेठेत
१५ दिवसांपासून भाव घसरले

घाऊक बाजारपेठेत १५ दिवसांपासून कांद्याचे भाव घसरले आहेत. कमीत कमी ४० ते १२० रुपये दहा किलो असा भाव आहे; तर सरासरी भाव ८० रुपये किलो आहे. पहिल्या श्रेणीतील कांदा १२० रुपये, दुसऱ्या श्रेणीतील कांदा ८० रुपये, तर तिसऱ्या व चौथ्या श्रेणीचा कांदा ६० ते ४० रुपये असा घाऊक भाव आहे. किरकोळ विक्रेते ५० ते ८० रुपयांत दहा किलो कांदा खरेदी करून १२० ते १५० रुपये दहा किलोच्या भावात विकत आहेत. काही विक्रेते प्रामाणिकपणे दहा रुपये किलो भावातही कांदा विक्री करीत असल्याचे चित्र किरकोळ बाजारात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT