कोल्हापूर

गडहिंग्लजच्या रंगकर्मीनी वेंगुर्लेकरांची मने जिंकली

CD

05480
वेंगुर्ला : नाट्य महोत्सवात सहभागी गडहिंग्लजच्या स्त्री कलाकारांसह शिवाजी पाटील, परितोष कंकाल, युवराज पाटील, निलेश शेळके, अमृत सावंत आदी उपस्थित होते.


गडहिंग्लजच्या रंगकर्मीनी वेंगुर्लेकरांची मने जिंकली
एस आय ब्लीड नाटक; लिंगभेदावर मंथन घडवणाऱ्या प्रयोगाचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या १४७ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि मधुसूदन कालेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वेंगुर्ला नाट्य महोत्सवात गडहिंग्लजच्या महिला रंगकर्मींनी एस आय ब्लीड नाटकाचे प्रभावी सादरीकरण करुन वेंगुर्लेकरांची मने जिंकली. प्रदीर्घ काळानंतर गडहिंग्लजच्या स्त्री रंगकर्मींनी नाटकाचा प्रयोग गडहिंग्लजच्याबाहेर करण्याचा हा पहिला प्रयत्न होता.
वेंगुर्ला नाट्य महोत्सवात दुसऱ्या दिवशी ‘एस आय ब्लीड’ या नाटकाचे सादरीकरण झाले. लेखक युवराज पाटील यांनी लिहिलेल्या संहितेला शिवाजी पाटील या दिग्दर्शकाने दिलेले मूर्त रूप हे सृजनशील होते.
पाटील यांच्या लेखणीची ताकद ही त्यांच्या संवाद लेखनातच आहे. त्याचा प्रत्यय नाटक पाहताना प्रत्येक प्रसंगात येतो. हे नाटक गडहिंग्लजच्या स्थानिक स्त्री रंगकर्मींनी अतिशय प्रभावीपणे सादर करून वेंगुर्लेकरांची मने जिंकली.
विशेषतः नाटकातील विभा शिंदे, भक्ती पाटील, समृद्धी पाटील, श्रावणी फल्ले या बालकलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. पाळी आणि लिंगभेदावर उघडपणे बोलणारा त्याबाबतचा समज-गैरसमजाबाबत मंथन घडवणारा नेटका प्रयोग गडहिंग्लजच्या स्त्री कलाकारांनी सादर केला. किरण (अर्णवी उपराटे), विशाखा (शिवानी डोमणे) आणि कमल आजी (ऊर्मिला कदम), रितू (सरोज शिंदे) मालती (प्रणोती कुमठेकर) यांनी प्रभावी भूमिका बजावली. नीलेश शेळके यांचे संगीत आणि अमृत सावंत यांची प्रकाश योजनेची साथ मिळाल्याने या नाटकाने उपस्थित प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाल
व नाट्य रसिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT