कोल्हापूर

पेरण्या खोळंबल्या

CD

KOP23M10198
जिल्ह्यात दहा हजार हेक्टरवरच पेरण्या
गेल्यावर्षीच्या तुलनेते ८० टक्के पेरण्या कमी : पावसाअभावी शेतकरी व्याकुळला

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : आज येईल, उद्या येईल म्हणत पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. गेल्या दोन वर्षी आतापर्यंत ९० टक्के परेण्या पूर्ण झाल्या होत्या. यातुलनेत यावर्षी केवळ १० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. मशागतीची कामे पूर्ण झाली असून, आता मॉन्सूनची वाट पाहत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. आणखी साते ते आठ दिवस पावसाने ओढ दिल्यास शेतात उभी असणारी पिके करपणार आहेत.
जिल्ह्यात गेल्यावर्षी (२०२२) १ लाख ९६ हजार ४६६६ हेक्टरपैकी १ लाख ७३ हजार ६१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे, तर यावर्षी मात्र १३ ते १४ हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ७ जूनला मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत पेरणीला सुरुवात झाली. राज्यात आणि जिल्ह्यात १० जूनपर्यंत मॉन्सून सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे जिल्ह्यात १९ जून २०२३ पर्यंत भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर धान्य आणि कडधान्यांची केवळ १३ ते १४ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. वळीव किंवा मॉन्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवल्याने शेती अडचणीत आली आहे.
जिल्ह्यात यावर्षी (२०२३-२४) खरीप हंगामामध्ये १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टरवर पेरणी केली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भात, नागली, ज्वारी, मका, कडधान्ये, भुईमूग व सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी वेळेत वळीव पाऊस झाला. मॉन्सूनही वेळेतच झाला. याचा परिणाम लाखो हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या. यंदा वळीव पावसाचे पाठ फिरवली. त्यामुळे, शेतकऱ्यांना आकाशाकडे डोळे लावून बसावे लागले. प्रत्येक वषी पाऊस ठरलेल्या वेळेत येतो. यावर्षी महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मॉन्सून येण्यास वेळ होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. मॉन्सून ४ ते ५ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल त्यानंतर हळूहळू इतर राज्यात सक्रिय होईल, असा अंदाज होता. आता १९ जूनचा दिवस उजाडला, तरीही निभ्रर आकाश पाहून शेतकरी व्याकुळ होत आहे. पावसाअभावी अजूनही पेरण्यांना म्हणावी तशी गती आलेली नाही. तसेच, शेतात उभी पिकेही वाळू लागल्याने नव्याने पेरणी करण्याचे धाडस केले जात नाही. जोरदार आणि दमदार पावसाशिवाय पेरण्यांना गती लागणार नाही, असेच चित्र आहे.

कोट
जिल्ह्यात पावसाअभावी १० टक्क्यांपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज पाहूनच पेरण्या कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. पेरणी करताना चांगल्या आणि निरोगी बियाणांचा वापर करावा, असेही आवाहन केले आहे.
- दत्तात्रय दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT