कोल्हापूर

पक्ष फुटीत कार्यकर्त्यांचाच बळी... म्हणून अनामिक ‘साहेबप्रेमी’ !

CD

gad66.jpg
14425
गडहिंग्लज : दसरा चौकातील बॅ नाथ पै प्रशालेच्या संरक्षक भिंतीवर लागलेला हा फलक गुरुवारी दिवसभर चर्चेचा ठरला.
--------------------------------------------------
पक्ष फुटीत कार्यकर्त्यांचाच बळी...
म्हणून अनामिक ‘साहेबप्रेमी’ !
गडहिंग्लजमधील डिजीटल फलक ठरतोय लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात समाविष्ट गडहिंग्लज शहरात शरद पवार प्रेमींचा फलक लागल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. कोणत्याही पक्षात फूट पडल्यानंतर पहिला बळी पडतो तो कार्यकर्त्यांचा. कोणत्या नेत्याला दुखवायचे या चिंतेत असणारे कार्यकर्ते अनामिक साहेबप्रेमी म्हणून डिजीटल बोर्ड लावतात. तसाच एक फलक आज शहरात झळकत आहे. परंतु अनामिक साहेबप्रेमी कोण, याविषयीची उत्सुकताही तितकीच आहे.
राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षातील कार्यकर्त्यांची बहुतांश ठिकाणी विभागणी होत आहे. गडहिंग्लजमध्ये आज दसरा चौकात एक फलक झळकला आहे. फलकावर कोणाचीच नावे नाहीत. अनेकवेळा कोणत्याही पक्षातील फूट ही कार्यकर्त्यांच्याच मुळावर उठते. इकडे आड आणि तिकडे विहिर, अशा स्थितीतील कार्यकर्त्यांचा अशा राजकारणात बळी जातो. तशीच अवस्था आता राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची झाली आहे. यामुळेच कोणाचेही नाव न टाकता शुभेच्छा, पाठींब्याची फलके लावली जात आहेत.
गडहिंग्लजमधील अशाच एका फलकावर केवळ, सर्वसामान्यांचे आधारवड अशी टॅगलाईन वापरुन ‘मा. शरदचंद्रजी पवार साहेबप्रेमी’ असा मजकूर लिहला आहे. आज दिवसभर हा फलक लक्षवेधी ठरला, तसेच उलटसुलट चर्चाही सुरु आहे. गडहिंग्लज शहरासह ग्रामीण भागात शरद पवारांना मानणाऱ्‍या कार्यकर्त्यांचा एक वर्ग आहे. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर इतर पक्षातही पवारांचे समर्थक आहेत. परंतु हा फलक नेमका कोणी लावला, याची चर्चा असून आमदार मुश्रीफ यांच्या मतदारसंघात गडहिंग्लज शहराचा समावेश असल्याने या फलकाबाबतची अधिक उत्सुकता पहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20 Rankings: टी-२० क्रमवारीत भारताचे वर्चस्व! अभिषेक–वरुण चमकले, सूर्यकुमारचे नेतृत्व अव्वल

Dev Deepawali 2025 : वाराणसीत देव दीपावलीचे अद्भुत दृश्य! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला पहिला दिवा

Latest Marathi Live Update News: आयटी दांपत्य फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई? आरोपींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

BJP vs Shivsena: शिंदेंना घरातच घेरण्याची भाजपची रणनीती, अंतर्गत बदल्याच्या राजकारणाने मोठी खळबळ! शिंदेसेनेचा कट्टर विरोधक निवडणूक प्रभारी

WPL 2026 Retention : वर्ल्ड कपची स्टार दीप्ती शर्मा संघाबाहेर; हरमनप्रीत कौर, स्मृती मानधनासह जेमिमाबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT