कोल्हापूर

दलित महासंघातर्फे मेळावा

CD

15339
कोल्हापूर : शाहू स्मारक भवनात आयोजित दलित महासंघाच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे.


दलित महासंघाची सुत्रे नव्या पिढीकडे
डॉ. मच्छिंद्र सकटे; वर्धापन दिन सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : ‘‘थांबायचं कुठं, ते मला बरोबर कळतं. यासाठी महासंघाची ही सुत्रे मी नव्या पिढीकडे सुपूर्द करत आहे,’’ असे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले.
दलित महासंघाच्या ३२ वा वर्धापन दिन सोहळा शाहू स्मारक भवनात झाला. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तत्पूर्वी, छत्रपती शिवराय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर दिपप्रज्वलन झाले.
प्रा. डॉ. सकटे म्हणाले, ‘‘पाच जुलै १९९२ ला बिंदू चौकात दलित महासंघाची स्थापना झाली. आज ३२ वर्षे पूर्ण झाली. या काळात मला कार्यकर्त्यांनी साथ दिली, ती पहिल्या दिवासांपासून. जिथे वाट नसते, तिथे वाट, दिशा निर्माण करावी लागते. महासंघाने अनेक आंदोलने राज्यभर गाजविली. निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. अनेकजण सोडून गेले; पण मी कुणाशी मतभेद केले नाहीत. तुम्ही माझ्याबरोबर असा वा नसा; पण मी मात्र महापुरुषांच्या विचाराबरोबर राहणार आहे.’’
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सी. बी. कोरे म्हणाले, ‘‘समाज व्यवस्थेतील खालील स्तरापर्यंत अनेक लोकांपर्यंत न्याय पोहोचलेला नाही. त्यांना न्याय मिळवून देण्याची न्यायाची चळवळ उभी राहिले पाहिजे.’’ महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे म्हणाल्या, ‘‘मुला-मुलींनी आता एमपीएससी, युपीएससीच्या प्रवाहात आले पाहिजे. त्यासाठी कसून अभ्यास केला पाहिजे. मग तुम्ही यशस्वी व्हाल. प्रशासन व्यवस्थेत तुमचा प्रवेश होईल. यासाठी जास्ती जास्त शिक्षण घ्या.’’
विलास कांबळे, सुनील अवघडे, भीमराव साठे, अनिल म्हमाणे आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांनी स्वागत केले. बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबुराव आयवाळे यांनी प्रास्ताविक केले. योगेश दाभाडे यांनी सुत्रसंचालन केले. उत्तम चांदणे, प्रकाश वायदंडे, शंकर महापुरे, राजाभाऊ खिलारे, प्रा. मनिषा कोळेकर, प्रा. प्रकाश नाईक, दिनकर वायदंडे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, सोलापूरमधील कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20I : ११ महिन्यांनी आला अन् चमकला! हार्दिक, जसप्रीत, हर्षितसह न्यूझीलंडवर 'तो' भारी पडला; वर्ल्ड कपसाठी दावा ठोकला

Pune News : गर्दीतून पुढे येत मयूरने वाचवला जीव; फीट आलेल्या व्यक्तीला दिली तातडीची मदत

Latest Marathi news Live Update : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मुझफ्फरपूरमध्ये राष्ट्रध्वज फडकवणार

कर्तव्यपथावर देशभक्तीचा जल्लोष! प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा कसा असेल? यावर्षीची थीम काय? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे राष्ट्राला संबोधन- "युवा पिढी देशाच्या बहुआयामी विकासाला दिशा देत आहे"

SCROLL FOR NEXT