कोल्हापूर

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

CD

gad181.jpg
16923
महागाव : कन्या विद्या मंदिरमधील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी कुणाल हजारे, अमर महाडिक, पवन कट्टीकर आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
गडहिंग्लज : उंबरवाडीतील प्राथमिक शाळा व महागाव कुमार व कन्या विद्या मंदिरमधील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कोल्हापूर जिल्हा भारतीय स्वराज्य सेनेतर्फे राजकुमार कोकीतकर व विश्‍वनाथ कोकीतकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला. जिल्हा सचिव कुणाल हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा अध्यक्ष अमर महाडिक, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष पवन कट्टीकर, प्रवीण चिमणे, निहाल मुगले, श्रवण विटेकरी, आदित्य जाधव, रोहित खंडाळे, श्रीधर पाटील, महादेव नाईक, गणेश पाटील, सुभाष रेडेकर आदी उपस्थित होते..
--------------------------------------------------------------
gad182.jpg
16924
मुंगूरवाडी : भगवद्‍गीता परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणप्रसंगी राधा गोपाल प्रभू, व्ही. एस. गुरव, ए. सी. देशमाने आदी उपस्थित होते.

भगवद्‍गीता परीक्षेत नौकूडकर प्रशालेचे यश
दुगूनवाडी : मुंगूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सौ. व. भि. नौकूडकर हायस्कूलमध्ये झालेल्या भगवद्‍गीता परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिद्धार्थ कमतेचा तालुक्यात चौथा क्रमांक आला. त्याला श्री राधा गोपाल प्रभू यांच्याहस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवले. सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र दिले. व्ही. एस. गुरव यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक ए. सी. देशमाने यांनी स्वागत केले. ए. एस. पाटील यांनी आभार मानले.
------------------------------------------------------------
gad183.jpg
16925
हसूरचंपू : अरविंद वाचनालयात स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण झाले. यावेळी प्रभावती बागी, सचिन शेंडगे, सुरेश फुटाणे, शिवप्रसाद स्वामी आदी उपस्थित होते.

अरविंद वाचनालयातर्फे विविध स्पर्धा
गडहिंग्लज : हसूरचंपू येथील अरविंद वाचनालयाच्यावतीने विविध स्पर्धा घेतल्या. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सरपंच श्रीमती प्रभावती बागी अध्यक्षस्थानी होत्या. उपसरपंच सचिन शेंडगे, शिवप्रसाद स्वामी, चेतन शहा, सूरज फुटाणे, पांडुरंग शेंडगे, वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश फुटाणे यांची भाषणे झाली. त्यांनी ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर मार्गदर्शन केले. मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर रोज एक तास वाचन गरजेचे असल्याचे ते म्हणाले. रंगभरण, निबंध, वक्तृत्व स्पर्धा झाल्या. विजेत्यांना बक्षीस वितरण झाले. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अजित कुरणे यांनी आभार मानले.
------------------------------------------------------------
‘शिंदे’मध्ये जिमखाना निवडणूक
गडहिंग्लज : येथील वि. दि. शिंदे हायस्कूलमध्ये जिमखाना निवडणूक उत्साहात झाली. अर्ज भरणे, छाननी, माघार, मतदार संपर्क, प्रचार व निकाल आदी प्रक्रियेद्वारे शालेय मंत्रिमंडळाची निवड केली. नऊ खात्यांसाठी ५७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांनी गुप्त पद्धतीने मतदान केले. ‘नेता कसा असावा’ या प्रबोधनपर गीताचे सादरीकरण झाले. विद्यार्थी प्रतिनिधीपदी आदित्य मुंगूरवाडे, विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी दीपाली पाटील हे विजयी झाले. मंत्रिमंडळात लहान व मोठ्या गटांतून १८ विद्यार्थी विजयी झाले. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने आर. बी. शिंत्रे, आर. बी. माने आदींनी नियोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT