कोल्हापूर

भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

CD

20145
गडहिंग्लज : पुरोगामी संघटनांतर्फे संभाजी भिडे यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. या वेळी श्रीपतराव शिंदे व विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा
नोंदविण्याची मागणी
गडहिंग्लज, ता. ३१ : देशातील विविध महामानवांबद्दल चुकीची वक्तव्ये करून संभाजी भिडे यांनी या महामानवांचा अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्यांनी समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न दिसत असून, त्यांचा जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदन येथील पुरोगामी संघटनांतर्फे प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांना आज दिले. या वेळी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करून भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन झाले.
निवेदनात म्हटले आहे, काही दिवसांपासून संभाजी भिडे महात्मा गांधी यांच्यासह विविध महामानवांबाबत अर्वाच्य भाषेत वक्तव्य करून अवमान करीत आहेत. हे महामानव देशाचे आदर्श आहेत. त्यांच्या अवमानामुळे देशाचा अवमान झाला आहे. तिरंगा व संविधानही मान्य नसल्याची राष्ट्रद्रोहाची भाषा भिडे करत आहेत. यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी.
माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्राचार्य कल्याणराव पुजारी, शिवाजी होडगे, बाळेश नाईक, बसवराज आजरी, आशपाक मकानदार, दिग्विजय कुराडे, प्रकाश भोईटे, कल्पना कांबळे, प्रकाश कांबळे, वसुंधरा सावंत, प्रा. पी. डी. पाटील, उज्ज्वला दळवी, ऊर्मिला कदम, बाळासाहेब मुल्ला, विजय शिरगावकर, संतान बारदेस्कर, शिवाजी रायकर, जोतिराम केसरकर, रमजान अत्तार, एस. पी. थरकार, रफिक पटेल, प्रल्हादसिंह शिलेदार यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Test Squad Announced: रिषभ पंतचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

Unseasonal Rains Cause: "पीक गेलं, आशा संपल्या… आणि आता जिओ टॅगिंगचा फोटोंचा त्रास शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाला कधी ऐकू येणार?"

Pune Viral Video: बिबट्याची थेट घरात एंट्री! मुलगा झोक्यावर… अन् पुढं काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ व्हायरल!

Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

Mumbai News: पुलाचे काम रखडले! घाटकोपरमध्ये पाच वर्षांपासून दुर्लक्ष; रहिवाशांची गैरसोय

SCROLL FOR NEXT