कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा लढवणार

CD

20211
...

राष्‍ट्रवादीकडून कोल्हापूर लोकसभा लढवणार

व्‍ही. बी. पाटीलः शरद पवार गटाच्या बैठकीत घोषणा

कोल्‍हापूर, ता.३१: ‘सत्तेचा पुरेपूर उपभोग घ्यायचा, भ्रष्टाचार करायचा आणि तो लपवण्यासाठी प्रसंगी बापाला बाजूला करून उडी मारायची, अशी प्रवृत्ती फोफावली आहे. या प्रवृत्तीला विरोध करणे व कोल्हापूरच्या विकासासाठी राजकारणात सक्रिय झालो असल्याचे सांगत आपण ‘कोल्हापूर’मधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्‍ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्‍हाध्यक्ष व्‍ही.बी.पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कोल्हापूर दक्षिणची बैठक सोमवारी (ता.३१) घेण्यात आली. या बैठकीत पाटील बोलत होते. शहराध्यक्ष आर. के. पोवार अध्यक्षस्थानी होते.

व्‍ही.बी.पाटील म्‍हणाले, ‘भाजपचे नेते चंद्रकांत पाटील पाच वर्षे मंत्री होते. मात्र त्यांनी कोल्हापूरचा काय विकास केला, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच त्यांना पुण्याला जाऊन विधानसभा निवडणूक लढवावी लागली. आता काही मंडळी त्यांच्यासोबत आहेत. मात्र कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा असून, तो कधीही भाजपला स्वीकारणार नाही.’

नितीन पाटील म्हणाले, ‘पक्षाध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर रस्त्यावर लढायला आम्ही, मात्र सन्मान दुसऱ्याचाच झाला. आता नव्या दमाने पक्ष बांधणी करण्याची गरज आहे.’ यावेळी पीटर चौधरी, सुनीता कांबरे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपमहापौर सुनील मोहिते, सुनील देसाई, प्रणिती कदम, मोतीलाल चव्हाण, पुष्पराज पाटील आदी उपस्थित होते.
...

राबायला आम्‍ही अन...

‘राष्ट्रवादीमध्ये आम्‍ही राबराब राबलो. मात्र दुसऱ्यां‍नीच पदे मिळवली. सत्तेची सर्व पदे कागलमध्ये देण्यात आली आणि मला मार्केट कमिटीत पाठवले. पण, दोन महिन्यात घरी आलो. कानात सांगणाऱ्यांचे ऐकल्यानेच पक्षवाढीस मर्यादा असल्याची टीका आर. के. पोवार यांनी केली. तर पूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी राधानगरी तालुका सोडून कधीही दौरा केला नाही. घरात बसून नियुक्त्या केल्याने पक्षाची वाताहात झाल्याची टीका निरंजन कदम यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT