कोल्हापूर

आज विसर्जन मिरवणूक

CD

मिरवणुकीत अवतरणार ‘चांद्रयान’
पारंपरिक वाद्यांसह मल्टिकलर शार्पी, एलईडी स्क्रीनचाही थाट

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः नऊ दिवसांच्या मुक्कामानंतर कोल्हापूरकर उद्या (गुरुवारी) जल्लोषातच सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांना निरोप देणार आहेत. पारंपरिक वाद्यांसह मल्टिकलर शार्पींनी आसमंत उजळून जाणार आहे. साऊंड सिस्टीमबरोबरच बहुतांश मंडळांनी धनगरी ढोलपथकांना निमंत्रित केले असून, ढोल-ताशा, लेझीम, ब्रास बॅंड पथकांचा थाटही अनुभवायला मिळणार आहे.
दरम्यान, नुकत्याच यशस्वी झालेल्या ‘चांद्रयान मोहिमे’ची झालरही मिरवणुकीला लाभणार आहे. चांद्रयान, सूर्ययानाची प्रतिकृती मिरवणुकीत अवतरणार आहे. अत्याधुनिक एलईडी स्क्रीनही काही मंडळे मिरवणुकीत आणणार आहेत.

० स्वागत मंडप सज्ज
विसर्जन मिरवणूक मार्गावर महापालिकेसह विविध राजकीय पक्ष, संघटनांच्यावतीने मंडळांचे पान-सुपारी देऊन स्वागत होणार आहे. त्यासाठी स्वागत मंडप सज्ज झाले आहेत. याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह आपत्कालीन व्यवस्थाही उपलब्ध केली आहे.

० झेंडे, लोगो अन् टॅट्यूही
शहरातील प्रत्येक तालीम मंडळ असो किंवा गणेशोत्सव मंडळांकडून विविधरंगी झेंडे, लोगोंचा ट्रेंड गेल्या काही वर्षांत मिरवणुकीत आणला आहे. त्याचबरोबरच यंदा टॅट्यूचा ट्रेंडही अनुभवायला मिळणार आहे.

- मिरवणुकीची वैशिष्ट्ये अशी...
० लेटेस्ट तरुण मंडळ (मंगळवार पेठ) ः स्वातंत्र्याची शौर्यगाथा चित्ररथ, सजीव देखाव्यासह एकशेवीस जणांचे झांज व ढोलपथक, धनगरी ढोल पथकांचे सादरीकरण
० शाहूपुरी युवक मंडळ (शाहूपुरी) ः नऊ फुटी चांद्रयान, सूर्ययानाच्या प्रतिकृतीसह रोव्हर, लॅंडरसह कार्यकर्ते होणार सहकुटुंब मिरवणुकीत सहभागी
० पाटाकडील तालीम मंडळ ः ढोल-ताशे, सिस्टीम आणि लेसर शोसह अठरा फुटी भव्य स्क्रीन. ही स्क्रीन आडवी असून, पहिल्यांदाच शहरात अशी स्क्रीन पाहायला मिळणार आहे.
० अवचित पीर तालीम मंडळ ः मिरवणुकीत अवतरणार चांद्रयान. साउंड सिस्टीम, लेसर शो
० हिंदवी स्पोर्टस्‌ ः धनगरी ढोल पथकाच्या निनादात ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’चा गजर आणि भंडारा उधळत मिरवणूक
० तटाकडील तालीम मंडळ ः पारंपरिक वाद्यांच्या गजरात साध्या पध्दतीने मिरवणूक
० फिरंगाई तालीम मंडळ ः टाळ्या वाजवत साध्या पध्दतीने मिरवणूक
० श्री तरुण मंडळ (कोष्टी गल्ली) ः साऊंड सिस्टीमचा निषेध म्हणून टाळ्या वाजवत पालखीतून मूर्तीची मिरवणूक
० दिलबहार तालीम मंडळ, सुबराव गवळी तालीम (प्रॅक्टीस क्लब), दयावान ग्रुप, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, जुना बुधवार तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, वेताळ तालीम मंडळ, रंकाळवेश तालीम मंडळ ः साउंड सिस्टीम, लेसर शो, मल्टिकलर शार्पी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: देशाचा आर्थिक विकास पण श्रीमंत-गरीबांमधील दरी वाढत आहे, मोहन भागवातांनी व्यक्त केली चिंता

Gandhi Jayanti 2025: विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या 'या' ७ शिकवणीतून अवश्य घ्यावे अमूल्य धडे

Dasara 2025 Vastu Tips: दसऱ्याला 'या' वस्तू उधार घेतल्याने होतो वास्तू दोष, जाणून घ्या

'देश मनुस्मृती नव्हे, तर भीम स्मृती म्हणजेच संविधानानुसार चालेल'; वाजपेयींचा उल्लेख करत RSS च्या मेळाव्यात काय म्हणाले माजी राष्ट्रपती?

Dussehra Melava 2025 Live Update : आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, स्वदेशी स्वीकारावं लागेल - सरसंघचालक मोहन भागवत

SCROLL FOR NEXT